पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशिक्षकासाठी टिपण- गटप्रमुख प्रशिक्षण ६ चूक की बरोबर लिहा १)...x दर महिन्यात निरोप देण्याची गरज नाही. पहिल्याच बैठकीत गटाच्या बैठकीची वेळ, तारीख व जागा नक्की करावी. लेखी निरोपाची गरज नाही. गट हा सगळ्यांचा, त्यामुळे सगळ्यांनी स्वत:हून यायचे. २)...x "मिनीटस्'ही बैठक झाल्यानंतर मिनीट बुकमध्ये लिहायची. काय झाले त्याचा अहवाल लिहिणं म्हणजे मिनीट्स लिहिणे. अजेंडा म्हणजेच कार्यक्रमपत्रिका म्हणजे बैठकीचे नियोजन. अजेंडा आधी व मिनीट्स नंतर लिहावीत. ३)...x कर्ज देणं घेणं हे गटातील सर्वांनी मिळून ठरवायचं. हे एकट्या प्रमुखानं ठरवायचं नसतं. चर्चा होऊनच ते ठरलं पाहिजे आणि ते सुद्धा सर्वांसमोर ! जेव्हा गटप्रमुख स्वत:च असे निर्णय घेऊ लागते तेव्हा समजावे की सदस्यांचा रस कमी होऊ लागला आहे. असे गट गटप्रमुखाच्या नावाने ओळखले जातात, गटाच्या नावाने नाही. म्हणून ते गट लवकरच बंद पडतात. ४)...X रेकॉर्ड गटप्रमुखानेच ठेवावे पण ते तिचेच काम असं नाही. बाकीच्यांनी तिला मदत करावी. अनेकदा गटप्रमुख सारी कामे हौसेने करते, विना मोबदला करते. तेव्हा तूच रेकॉर्ड ठेवावंस. किंवा 'रेकॉर्ड ठेवलंस की नाही? असा जाब विचारण्याच्या भूमिकेत सभासदांनी जाऊ नये. लक्ष असावं हे मात्र नक्की. 'बायका' कमी पडतात म्हणून पुरुषाच्या मदतीची गरज नाही. त्यांनी ते शिकलं पाहिजे. गट प्रमुखांच्या घरचेच पुरुष फक्त लक्ष जास्त घालू लागले तर गटाचे रूपांतर त्या घराच्या 'सावकारीत' व्हायला फारसा वेळ लागणार नाही हे लक्षात घ्यावे. गरज पडल्यास तरुण मंडळ कार्यकर्त्याची जरुर मदत घ्यावी. आधी गटाची आर्थिक घडी नीट बसवावी. मग सामाजिक चर्चा. चांगले काम उभे राहण्यासाठी आर्थिक पाया पक्का असण्याची गरज असते. आर्थिक गडबड करणारा कुठलाही गट सामाजिक काम उभं करू शकत नाही. विधान बरोबर आहे. ८)...x कॅश टॅली करण्यासाठी आधी जमाखर्च पत्रक तपासावे. तरीही जमणारी रोख ही आवश्यक रकमेशी जुळली नाही तर पासबुकं तपासावीत. जमाखर्च पत्रक हे रोख जुळण्याचं पहिलं पुस्तक. ९)...x पैसे गोळा करण्याचा दोन पद्धती आहेत. आधी बचत घ्यावी किंवा एकेकीचा पूर्ण व्यवहार एका वेळी करावा. यात दोन्ही पद्धती बरोबर आहेत. पण पद्धत काय आहे त्यावर चर्चा होणं महत्त्वाचं. याच वेळी पैसे जमा करताना नोटा कशा ठेवतात हेही विचारावे. एका प्रकारच्या नोटा एकत्र, म्हणजे १०० च्या व ५० च्या नोटांचे वेगळे गढे करावेत असं सांगावे. १०)...x बँकेत गटातील महिलांनीच गेलं पाहिजे. हेच निमित्त आहे बँक समजून घेण्याचं. एखाद्या वेळी पुरुष मंडळी गेली तर बिघडत नाही, पण बायकांनी बँकेत जायला वेळ काढायला हवा. गरज पडल्यास गटाने दिवसाचा रोज द्यावा. प्रवासखर्च द्यावा. ११)...X गट सभासदांचा आहे, गटाची हिशोबाची घडी बसवायला संस्था मदत करते. पण सर्व जबाबदारी सभासदांचीच. गटातल्या नफ्याच्या त्याच तर मालकिणी असतात. मग जबाबदारी त्यांचीच नको का? १२)...। हिशोब तपासायचे म्हणजे स्वत:चं कर्ज, बचत, व्याज दिलं तेवढंच लिहिलंय ना? येणे बाकी आपल्याला मान्य आहे ना? याची खात्री करावी. ★★★★★