पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
मग काय करायचं?

१) ससेवाडी डोंगर कपारीतील गाव. तिथल्या महिलांमध्ये शेजारच्या शिंदेवाडी गावच्या सरपंच बाईची नेहमी ऊठबस असे. ती म्हणाली, तुमच्या गटात मी पण येते. बाकी महिलांनी तिला गटात घ्यायचे का? होय /नाही |
२) जिजाबाई गटप्रमुख! त्या दर महिन्याला थोडे तरी अर्थसाहाय्य घ्यायच्या. त्या संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या ओळखीच्या आहेत. त्यामुळे त्यांना कोणी बोलायचं नाही. हे बरोबर आहे का? होय/ नाही.
३) कविता गावची नवी सून. अगदी हुषार. चांगली दहावी झाली होती. तिची गट प्रमुख व्हायची तयारी होती. तिला चौथा महिना चालू होता. तिला गटप्रमुख करावे का? | होय/ नाही
४) पारुबाईला बी-बियाणे खरेदीसाठी गटातून ५०० रुपये हवे होते. सविताच्या पोरीला नवीन कपडे घ्यायचे होते म्हणून ३०० रुपये हवे होते. गटात तर फक्त रु. ६०० जमले. आता वाटप कसे करायचे? पारुबाई | सविता | ५) ताराबाई गावची पुढारीण. तिने बायांना बोलावलं की साऱ्या गोळा व्हायच्या. तिचे गटात खाते होते. गटाचा महिन्याचा व्यवहार झाला की थोडे पैसे शिल्लक रहायचे. पण गटातल्या इतर सभासदांना वाटायचं की ताराबाईकडे पैसे ठेवू नयेत. काय करावे?


६) आशाताई गावाच्या ४ गटांचा सगळा हिशोब मांडतात. त्यांनी स्वत: अर्थसाहाय्य (कज) घेऊन ते कर्ज दुसऱ्यांच्या नावापुढे मांडलं. तुम्हाला हे कळले तर काय कराल?


७) पाटलाच्या सुनेला शेतावर येणाऱ्या मजूर बायकांकडून कळलं की गावात गट सुरू होऊन ३ महिने झालेत. ती गटात गेली. तिनं सारे पैसे भरले. ती म्हणाली, आता गट आमच्याच घरी घ्या. काय करावं?


८) गटाच्या कामासाठी सीमाताईला सारखे बाहेर जावे लागायचे. वर्षभरानंतर ती म्हणाली, माझ्याऐवजी दुसऱ्या कुणीतरी जावे. पण बाकी म्हणायच्या, 'तू प्रमुख झालीस तर तूच कर सारे काम. आम्हाला वेळ नाही.' तर काय करावं?

★★★★★