पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

घटस्थापन COSM

टप्पा २ : गटप्रमुख प्रशिक्षण

। गटाची यशस्विता ही गटप्रमुखाच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. __सर्वांना बरोबर घेऊन गटप्रमुखांनी गटाचे व्यवस्थापन करायचे असते म्हणून :- P सोयीचे ते योग्य मानण्याची मानसिकता, पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन, पदाचा योग्य वापर, तारतम्य, हिशोबातील अचूकता, विवेक, दबाव, पूर्वानुभव, पुढाकार अशा अनेक बऱ्या वाईट गोष्टींवर गटप्रमुखांची योग्य भूमिका तयार करण्याचे काम . ही प्रशिक्षणे करतात. म्हणून वैयक्तिक व्यावहारिक कौशल्यांवर भर दिला आहे. या प्रशिक्षणामध्ये सामाजिक घटकांचा समावेश केलेला नाही. थोडक्यात गट प्रमुखाची कार्यक्षमता वाढावी यासाठी ही प्रशिक्षणे योजली आहेत. या प्रशिक्षणांची वारंवारिता दोन महिन्यातून एक वेळा अशी असावी. कमीतकमी तीन तास, एका वेळेला एक धडा, अशा पद्धतीने प्रशिक्षण घ्यावे. दोन सत्रांमध्ये प्रशिक्षण विभागावे. दोन सत्रांमध्ये मोकळीक असावी. प्रशिक्षणाची सुरुवात खेळाने करावी. त्यामुळे वातावरण मोकळे होते. गटप्रमुखांचा सहभाग वाढतो. एकाच दिवसात सर्व उरकू नये. कारण यातील अनेक मूल्ये ही चर्चेने सभासदांपर्यंत पोहोचणे व ती प्रत्यक्ष अंगीकारली जाणे यात खूप अंतर असू शकते. त्यामुळेच गट जुना झाला तरी संकल्पनात्मक प्रशिक्षणे घेत राहावी लागतात. टप्पा २ च्या प्रशिक्षणात गटप्रमुखांसाठी सभासदांपेक्षा जास्त जबाबदारीची परिस्थिती लक्षात घेतली आहे. १ मग काय करायचं ? २ थोडी गणिते करू या ३ सांगा पाहू व्याज काय ?

  • सेवाशुल्क दर तक्ता

४ पासबुक नोंदवा ५ स्पर्धा १ - कॅलक्युलेटरने बेरीज करा. ६ चूक की बरोबर लिहा. ७ ताळेबंद बनवा. ८ स्पर्धा २ - रक्कम मोजा.