पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
चूक कोणाची?

खाली गटांमध्ये घडणाऱ्या काही घटना दिल्या आहेत त्या वाचाव्यात. असं आपल्या गटात घडतं का? आठवा. यात काही चुकलं का ? यावर विचार करा जर चुकलं, तर कोण चुकलं त्यावर (/) खूण करा.
१) रामवाडीतल्या दुर्गामाता बचतगटाची बैठक रात्री९ वाजता असायची, गट प्रमुख असणारी शैला गट शि घ्यायची. गटात असणारी सीता गटाचे पैसे नेहमीच शैलाकडे सकाळी नेऊन द्यायची. काही चुकलं का? कोण बरं चुकलं?
चूक : सीता/ शैला/ दोघी
२) गटप्रमुख जनाबाई म्हणाली म्हणून बँकेच्या कोऱ्या अर्जावर रेखाने सही केली.
चूक : बँक मॅनेजरची / जना/रेखा /दोघींची/ संस्था कार्यकर्तीची
३) सुजाताने ऑगस्टमध्ये गटातून कर्ज घेतले, तेव्हा हिशोब रेणुका लिहीत होती. सुजाताच्या पासबुकावर कर्ज लिहावयाचे राहून गेले..
चूक : सुजाता/ रेणुका/ दोघींची/ पूर्ण गटाची / जामिनदारांची
४) गटात सगळ्यांचे पैसे सरुताई गोळा करत होती, गरज पडल्यास सुटे अथवा बंदे स्वत:च्या पैशातून करत होती. गटाच्या हिशेबात ५० रुपये कमी आले.
चूक : सरुताई/ सगळ्यांची/ खजिनदाराची
५) बँक कर्ज परतफेडीचा हप्ता सुशीलाने गटाच्या बचत खात्यात भरला.
चूक : सुशीलाची/ सचिवाची/ गटप्रमुखांची/ बँकेची
६) भीमाबाईला गटातून ३००० रुपयांचं कर्ज लागत होतं, तिला ते मिळालं. ती कर्ज घेऊन घरी गेली. दुसऱ्या दिवशी ती सकाळीच गटप्रमुख असलेल्या राधाकडं गेली आणि म्हणाली, "त्या रकमेत १०० रु. कमी आहेत."
चूक : भीमा/ राधा/ गटाची

★★★★★