पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बरोबर विधाने ओळखा

खाली दिलेली विधाने पूर्ण वाचावीत व ते विधान चूक वाटल्यास (X) अशी खूण करावी, बरोबर वाटल्यास (✓) अशी खूण करावी.

१) बचत गट म्हणजे फक्त पैशाच्या उलाढाली.
२) गट प्रमुखांनी बचत गटाची सारी कामे करायची...
३) कर्ज मिळावे म्हणून गटाचे सभासद व्हावे.
४) गटामुळे आत्मविश्वास वाढतो. पैशाचे व्यवहार कळतात.
५) कर्ज वाटपाचे काम फक्त प्रमुखांनीच करावे.
६) गट प्रमुखांनी गटात सवडीने पैसे आणून दिले तरी बिघडत नाही.
७) गट प्रमुखांनी घरोघरी जाऊन गटाचे पैसे गोळा केले तरी चालतील, कारण पैसे गोळा होणं महत्त्वाचं.
८) बचत गटामुळे महिलांना एकत्र येण्याची संधी मिळते.
९) गट सगळ्यांच्याच मताने चालवायचा.
१०) गट दरवर्षी फोडायचा असतो.
११) गटांचे काम बरोबर चालत आहे असे पुरुषांनी बघायला पाहिजे.
१२) पैशाचे व्यवहार करता येणाऱ्यांनीच गट करावेत किंवा गटात जावे.
१३) १५ जणींचा किंवा २५ जणींचासुद्धा गट होऊ शकतो.
१४) प्रत्येक सभासद महिलेने दर महिन्याला गटात आलेच पाहिजे.
१५) सरकारी योजनांसाठी गट करायचे असतात.
१६) अडाणी महिलांसाठी गट काय आणि सावकार काय, दोन्ही सारखेच.
१७) गटामुळे चारचौघात वावरायची, बोलायची सवय होते.
१८) फक्त महिलांनाही बचत गट उत्तम प्रकारे चालवता येतो. गटामुळे महिलांना बँकेचे कर्ज मिळते.
१९) बायजाबाईनी पुढाकार घेऊन गट सुरू केला. पण ती अंगठा बहाद्दर. तरी तिला गटाचं प्रमुख करावे का?
२०) दर महिन्यात सर्व सभासदांना पैसे ठेवायला बँकेत जावे लागते.
★★★★★

..........................................