पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
प्रशिक्षकासाठी टिपण - सभासद प्रशिक्षण २
सावकारापेक्षा गटच बरा

 सखुबाई सावकाराकडे गेली. तिनं ५ % दरानं लेकीच्या लग्नासाठी ५००० रुपये घेतले. तर ती कसे फेडते ? रु ५०००/- घेतले. व्याज रु. २५०/-कापून हातात मिळाले रु. ४७५०/- कर्ज घेतल्यापासून ८ महिन्यात सखूने कर्ज फेडले. सावकार दोन पद्धतीने व्याजाची आकारणी करतो.
१) स्थिर व्याज दर : कर्जाची परतफेड केली तरी सावकार मूळ मुद्दलावर व्याज घेत राहतो. जसे टेबल १ मध्ये दरमहा रु. २५०/- प्रमाणे सखू ८ महिन्यात एकूण व्याज रु. २००० देते. ते सुद्धा रु. ४७५० वर (कारण पहिल्याच महिन्यात व्याज कापून तिच्या हातात पैसे मिळतात.)
२) उतरते व्याज : परतफेड जसजशी होईल तसतसे उरलेल्या मुद्दलावर व्याज आकारले जाते. तसे केले तर रु. २००० ऐवजी व्याज रु. १२१४/- भरले जाते. ते टेबल २ मध्ये दाखवले आहे. तरी ते जास्तच आहे. टेबल १- स्थिर व्याज दर टेबल २- उतरते व्याज | महिना घेतलेले साहाय्य येणे बाकी व्याज एकूण जमा | महिना घेतलेले साहाय्य येणे बाकी व्याज एकूण जमा । साहाय्य परतफेड रकम । साहाय्य परतफेड रक्कम मार्च ५००० ५००० २५० २५० मार्च ५००० ५००० २५० २५० | एप्रिल ७५० ४२५० २५० १००० एप्रिल ७५० : ४२५० २५० १०००। में ७५० ३५०० २५० १००० में ७५० ३५०० २१३ ९६३ जून ७५० २७५० २५० १००० जून ७५० २७५० १७५ ९२५ जुलै ७५० २००० २५० १००० जुलै |७५० २००० १३८८८८ ऑगस्ट ७५० १२५० २५० १०००|ऑगस्ट ७५० १२५० १०० ८५० सप्टेंबर | ७५० ५०० २५० १००० सप्टेंबर ७५० ५०० ६३८१३ ऑक्टो . ५००० २५० ७५० |ऑक्टो . ५०० ० २५५२५ एकूण ५००० ५००० २०००| | ७००० एकूण ५००० ५००० १२१४ | ६२१४

गटाचा हिशोब

 गट साधारण २ % दरमहा दराने कर्ज देतो. गट म्हणजे सावकार नसल्याने किंवा गटात कोणी एकण सावकार नसल्याने व गटाचे पैसे सर्वाचे मिळून एकत्र असल्याने कर्जावर व्याज न म्हणता आर्थिक सेवा शुल्क असा शब्द वापरला जातो, हे समजावून सांगावे. सखूच्या ५००० रक्कमेला २% दरमहा दराने काय शुल्क पडते ते टेबल ३ मध्ये दाखवले आहे. तिला ८ महिन्यात फक्त ३८५ रु. भरावे लागतात व ते सुद्धा पूर्ण ५००० रकम हातात पडल्यावर ! जर ह्या गटात १५ जण आहेत असं धरलं तर गटात नफा वाटून घेताना तिनं या भरलेल्या रु. ३८५ शुल्कातले तिला २५.६० रुपये परत मिळतात. (रु. ३८५ /१५ जणी = २५.६० रुपये) कारण गटातील पंधरापैकी ती एक मालकीण आहे. म्हणजे तिचे ३५९ रुपयेच व्याज किंवा शुल्क गेले.

टेबल ३- बचत गटाचे आर्थिक सेवाशुल्क

साहाय्य परतफेड आर्थिक सेवा शुल्क एकूण जमा रक्कम । महिना मार्च एप्रिल घेतलेले साहाय्य ५००० | येणे बाकी ५००० ४२५० ३५00 २७५० २००० १२५० ५०० ७५० ७५० ७५० ७५० ७५० ७५० ५०० ५००० १०० ८५ ७० ५५ ८५० ८३५ ८३० ८०५ ७९० ७७५ ५१० ५३८५ ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टो. एकूण २५ १० ५००० ३८५