पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/१३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
पैसे असे खेळतात.....
सखुबाईकडं एक १० रुपयाची नोट होती.
तिच्या घरी पाहुणे आले म्हणून तिला सरबत करायचं होतं.
ती गेली पारुकडे. १० रुपयाची नोट देऊन तिच्याकडनं तिनं
४ लिंबं खरेदी केली.
पारुचं दळण भिमाबाईच्या गिरणीत दळायला दिलं होतं.
पारुनं सखुनी दिलेली १० रुपयाची नोट
भिमाला दिली आणि दळण घेऊन आली.
भिमेचं झंपर राधाकडं शिवायला दिलं होतं.
पारुनं दळणाचे दिलेले १० रुपये तिनं राधाला दिले आणि
झंपर घेतलं. राधाने ते १० रुपये चहासाठी साखर
आणायला वापरले तेव्हा ते दुकानदार सुजाताकडे गेले.
म्हणजे बघा, १० रुपयाची नोट एकच होती,
पण त्यातनं सखुला-लिंब, पारुला-दळण, भिमेचा-झंपर,
राधेसाठी-साखर अशा ४ जणींची खरेदी झाली.
आणि पुन्हा सुजाताकडं १० रुपये जमा झाले.
म्हणजे नोट फिरत राहिल्यामुळे
४ जणींची मिळून ४० रुपयांची गरज भागली आणि
१० रुपयाची नोट हाताशी शिल्लक राहिली.
१० रुपयाची नोट फिरत राहिल्यामुळे पुढेही
अनेक जणींची गरज भागवेल.
यालाच म्हणायचे पैसे खेळते राहणे.
आपापसात व्यवहार करण्याचा हाच उपयोग असतो.
बचत गटाच्या व्यवहारामुळंही अगदी असंच होतं!
गरज अनेकींची भागते आणि पैसे गटातच राहतात.
★★★★★