पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/१२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रशिक्षकासाठी टिपण - सभासद प्रशिक्षण १

पैसे असे खेळतात.....

 एखाद्या गावात नवीन गट सुरू करायचा असला तर सावकार, बँक अशी तुलना करून गटाचे महत्त्व सांगितले जाते. तेव्हा पान क्र. ११ वरील गोष्ट सांगितल्याचा उपयोग होतो.
 वर्ष झालेल्या एखाद्या गटात परतफेड नियमित होत नसेल तरी या गोष्टीचा उपयोग होतो. एखादी व्यक्ती कर्ज घेऊन व्याज देते, परतफेड करत नाही आणि म्हणते 'पैसे कुणाहीकडे गेले तरी व्याज तेवढेच मिळते' तेव्हा परतफेड लवकर झाली तर गटातल्या अनेकींच्या गरजा भागतात हे सांगायलाही याचा उपयोग होतो.
 यावर चर्चा करत एक तास तरी सत्र घ्यावे. सत्राची सुरुवात करताना रस वाढावा म्हणून सोबत एक १० रुपयाची नोट द्यावी. 'ह्या नोटेतून किती खरेदी कराल?' असा प्रश्न विचारावा, त्यावर उत्तरे द्यायला सांगावीत, ती फळ्यावर लिहावीत. मग 'माझ्याकडे जादूची नोट दिसते ह्यातून मी खूप खरेदी करू शकते' असे विधान करून मग हे सांगावे. या नाट्यमयतेमुळे ऐकणाऱ्याचा उत्साह वाढतो व पुढील प्रशिक्षणातही रस वाढून सहभाग वाढतो.

★★★★★