पान:बंदखलास.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


हजारों वेळां त्याचा जो अपमान केला आहे तो त्याने स- हन करावा असा हलका आहे काय ? तुमच्या दुष्ट स्वभा वाची व दुष्ट कर्माची वेडी तुमच्या हातांपायांत आहे, आ णि देवाच्या क्रोधाने तुलाला अंधार कोठडींत कोंडून ठे- विले आहे.
 ह्या बंदिशाळेचा राखणदार सैतान आहे. जेव्हां तुमचे पूर्वज व तह्मी देवाच्या आज्ञा मोडून त्याचे ऋणकरी झालां तेव्हां तुह्मी ह्या बंदिशाळेत पडलां आणि शेवटली दमडी फिटे पर्यंत तुमची सुटका होणार नाही. परंतु ही फेड केव्हां होईल ? मनुष्याच्या मूळ पूर्वजानें जेव्हां देवाविरुद्ध बंडाळी केली तेव्हां देवाने त्याला ह्या बळकट हत्यारवंद राखणदाराच्या स्वाधीन केले, आणि त्यानें त्यांस साखळदं- डाने बांधून अंधार कोठडीत टाकिले. मनुष्याचे जन्मापासून सैतान त्याचा राखणदार आहे. जशी बाबेलन देशांत पाडा- व करून नेलेल्या यहुदी लोकांची तेथे जन्मलेली मुले तेथ- ल्या राजाचे बंदिवानादाखल होती त्याप्रमाणे सैतानाची वं- दिशाळा ही आमची जन्मभूमि होय. जन्मापासून आमच्या डोक्यावर देवाज्ञेच्या कर्जाचे ओझे आहे, व आमच्या अंत:- करणांत त्याजविरुद्ध बंडाळी आहे. जन्मापासून आह्मी