पान:बंदखलास.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


ता हीच त्याची गगनचुंचित उंच भिंत पाप हेच त्याचे महाद्वार, ईश्वरी क्रोध हाच त्याच्या भोवतालचा जब्बर खंदक.
 आतां मी तुझाला ममतेने विचारितो कीं, हा तुरुंग फो- डून बाहेर पडायाला तुमच्यापाशीं सामर्थ्य आहे काय ? ज्या स्वाभाविक भ्रष्टतारूप कठीण व पाषाणमय भिंती त्या- च्या भोवती आहेत त्या पाडायास किंवा फोडायास तुलाला शक्ति आहे काय ? तुमच्या पापांचा जो डोंगर झाला आहे तो ओलांडून जाण्यासाठी तुमच्याने पुण्याचा घाट बांधवेल का- य? किंवा नीतीची वाट करवेल काय ? किंवा न्यायीपणा- चा बोगदा पाडवेल काय ? तुमची पापे तुमच्याने भस्म क रवतील काय ? ज्या ईश्वरी क्रोधरूप लाटा तुमच्या भोवतीं उचंबळत आहेत त्यांमधून पैलतिरी पोहून जायाला तुह्मा- ला बळ आहे काय ? आपल्या कोणत्या सत्कर्माने तुझीं परम पवित्र व पापाचा अत्यंत द्वेष्टा असा जो परम थोर परमेश्वर त्या- ला प्रसन्न कराल, आणि आपल्या भ्रष्ट व मळीण अंतःक- रणाकडे त्याला संतोषाने पाहायास लावाल? त्याजविरुद्ध केलेले तुमचे कोट्यानकोटी अन्याय त्यानें पोटीं घालावे असे ते हलके आहेत काय ? तुह्मी त्याच्या आज्ञा मोडून