पान:बंदखलास.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


अचाट कर्म करून तेथून निसटला, तरी तो कैदीच लेख- ला जाईल. त्याप्रमाणेच समजा की, सैतानाच्या अटकेतून कोणी मनुष्य अपूर्व कृत्य करून सुटला व पापाच्या बंध नापासून मुक्त झाला तरी तो दुःखीच राहील; कारण त्याज- वर देवाच्या यथार्थ न्यायाचे ढंग सर्वदां लोंबकळत राहती. ल. त्याने देवाच्या पवित्र आज्ञांचें जें उल्लंघन केले आहे त्यामुळे त्याजवर देवाचा क्रोध झाला आहे. त्या क्रोधानें भरलेले काळे भोर ढंग त्याजवर केव्हां कोसळेल व त्याला बुडवून टाकील याचा भरवसा नाहीं. ह्या बंदीशाळेत राह- णारांस ईश्वरप्रीतीच्या प्रकाशांत चालणारे असे जे मुक्त झालेले लोक ते दुरून दिसतात, परंतु त्यांजकडे जाण्याला त्यांस मार्ग नाहीं. त्यांच्या व ह्यांच्यामध्ये एक मोठा खंदक आहे, त्याचें नांव ईश्वरी क्रोध. तुझी जी पापे केली आहेत त्यांजमुळे देव तुह्मावर रागे भरला आहे. ह्या क्रोधरूप खं दकावर तुमच्यानें स्वकर्मरूप सेतु (पुल ) बांधून मार्ग कर वत नाहीं, अथवा तुमचे नवस, व्रतें, उपवास, प्रार्थना, दा- ने यांकडून त्यांतील पाणी अटवून तुमच्यानें पलीकडे जाव- वत नाहीं.
 अशा प्रकारचा हा तुरुंग आहे. मनुष्य स्वभावाची भ्रष्ट-