पान:बंदखलास.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

डोलकाठचा त्याजवरून पाहणारास मुसळा सारख्या लहान दिसत. अशा खडकावर तो तुरुंग होता. त्यांत प्राचीन काळी मोठमोठ्या शूर पुरुषांस जन्मठेपेची कैद भोगण्या- करितां ठेवीत. तेथून त्यांस सुटून जाण्याचा मार्ग नव्हता, व त्यांची ओरड कोणालाही ऐकूं जात नसे.

 ही समुद्रवलयांकित खडकावरील बंदिशाळा: सैताना- च्या बंदिशाळेची प्रतिमा होती. त्या खडकावर वादळाची ढगें रात्रदिवस लोंबकळत असत. त्याप्रमाणे ईश्वरी क्रोध- रूप दाट ढग ह्या बंदिशाळेवर डवरले आहेत. हा. खडक व पलीकडल्या कांठची जमीन यांच्यामध्ये मोठी खाडी होती, ती ओलांडून जाण्याला कोणत्याही कैद्याला शक्ति: नव्हती. त्याप्रमाणेच सैतानाच्या तुरुंगाच्या व ज्या प्रदेशांत देवाचे मुक्त झालेले लोक चालतात त्यांच्या मध्ये मोठा चर आहे, तो कोणत्याही बंदिवानाला आपल्या सामर्थ्याने ओ- लांडून जाववत नाहीं. ह्या उदास जाग्यावर सूर्याचा प्रकाश कधीं पडत नाहीं.
 वर जो समद्रांतील खडकावरील बंदिखाना सांगितला. त्यांतून कोणताही कैदी कधींच स्वपराक्रमाने सुटून मोकळा झाला नाही. पण असे समजा की, एखादा मनुष्य मोठे :