पान:बंदखलास.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ १. - बंदिशाळा. - सैतानाने ज्या बंदिशाळेत सर्व मनुष्यांस टाकिलें आहे ती फार भणभणीत व उदास आहे. तिच्या भिंती इतक्या मजबूत आहेत की, त्या फोडून कोणी कैदी कधीं बाहेर पडला नाहीं. त्या इतक्या उंच आहेत की, त्यांजवर चढून , . कोणी मनुष्य खाली उतरला नाही. त्यांचे पाये इतके खोल आहेत की ते खणून त्यांच्या मधून कोणी पार गेला ते नाहीं. ह्या भिंतींची उंची आकाशापर्यंत गेली आहे, त्यांची खोली नरकापर्यंत पोचली आहे. त्या भिंती दगडा धोंड्या- च्या नाहीत, तर पितळेच्या आहेत. मनुष्यस्वभावाची भ्रष्टता हीच ही बंदिशाळा आहे. हींत सैतानाने सर्व मनुष्यांस कोंडून ठेविले आहे. - ही बंदिशाळा मोठ्या बंदोबस्ताची आहे इतकेंच नाहीं, तर ती फार भयाण व भणभणीत आहे. मी एकदां एक तुरुंग पाहिला होता, तो समुद्रांत खडकावर बांधला होता, त्याजवर एकही सुंदर झाड नव्हते, केवळ खाऱ्या पाण्या- चे कडवें रान मात्र माजले होतें. तो इतका उंच होता की त्याच्या जवळून जाणाऱ्या मोठ मोठ्या लढाऊ गलबतांच्या