पान:बंदखलास.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

20 २. ३. ४ बंदिशाळेत पडला होता, त्याला देवाच्या दुताने जेव्हां बाहे- र काढले व एका चौकांतून दुसऱ्या चौकांत, व एक पाह- रा ओलांडून दुसऱ्या पाहऱ्यांत आणिले तेव्हां त्याला त्या तुरुंगाचे मोठाले दरवाजे व जाड अडसर व धिप्पाड पाहरे- करी दृष्टीस पडून तो थरथरां कांपूं लागला. तेथल्या उंच जंग्यांच्या भिंती पाहून त्याचे काळीज थर्र झाले असेल. याप्रमाणे जो मनुष्य तुरुंगाच्या बाहेर निघतो त्याच्या दृष्टी- स पडूं लागतें, पण जो त्याच्या अंधार कोठडीत निजलेला असतो त्याला कांहीं दिसत नाहीं. आपला तुरुंग किती भयंकर आहे याची त्याला कल्पना करवत नाहीं. प्रिय मित्र हो, जे पापाच्या व सैतानाच्या बंदिशाळेत प डले आहेत त्यांनी आपली स्थिति जाणावी, आणि सैतानाने न्यांस कशा करितां बांधून ठेविले आहे हे पाहावे, व त्याच्या हातांतून सुटून जाण्याचा कोणता उपाय आहे तो समजूग घ्यावा, हे हेतु धरून हे पुस्तक लिहिले आहे. ह्या विषयाचे तीन विभाग करितां येतात, ह्मणजे,-- - १. बंदिशाळा. बंदिवान बंदखलास.