पान:बंदखलास.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बंदखलास. बंदिवानांस मोकळीक गाजवून सांगावाला पर- मेश्वराने मला अभिषिक्त केले आहे. -यशाया. ६१.१. बंदिशाळा, अंधार कोठडी, खोडा, बेडी हे विषय म ●नाला विचार करायाला प्रिय नाहीत. आणि बंदिवान होणें हे तर त्याहून वाईट आहे. तथापि एका प्रकारच्या बंदि- शाळेविषयीं तुह्मांस सांगण्याचा मी निश्चय केला आहे. ती बंदिशाळा अशी आहे कीं, तशी कोणत्याहि जुलमी व नि- दय राजाने आजपर्यंत बांधिली नाहीं. हिचे नांव पापाची बंदिशाळा. आपणां सर्वांस हिची थोडी बहुत माहिती आहे, परंतु जे तिच्यांतून सुटले आहेत ते जसे तिचे माहितगार आहेत तसे जे तिच्यांत आहेत ते नाहींत. जे तींत कैदी आहेत त्यांस तिच्या भिंती किती उंच आहेत व त्यांजवरील पाहरेकरी कसे सावध आहेत, व ते स्वतां किती दुःखी व लाचार आहेत याविषयींची कल्पना करितां येत नाहीं. फार प्राचीन काळी पेत्रस नामक एक ईश्वर भक्त एका C