पान:बंदखलास.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६

उभा आहे त्याजविषयीही नवे विचार त्याच्या मनांत येउ लागतात. तो आपणांशी असे बोलू लागतो की, " मी त्याला आंत येऊं द्यायाला कां भ्यावे ? एथे राहणे मला मरणच आहे. तो आपल्याविषयीं जे ह्मणतो तसाच खरोखर अ- सला आणि त्यानें बंदिशाळेचे दरवाजे उघडले असले व बंदिवानांस मोकळे करण्याकरितांच तो आला असला, तर मी बाहेर न जावे हे केवढे मूर्खपण आहे"?
 असा विचार करून तो चिंतातुर झालेला पापी आपल्या दारापासून बाजूला होतो. मग मनुष्याच्या हातांपेक्षां सुंदर असा एक हात गवाक्षाच्या (खिडकीच्या) आंत घातलेला त्या- च्या दृष्टीस पडतो. "त्याच्या मुठीवरून घमघमता बोळ गळत आहे, " तो पाहून त्या कैद्याच्या जीवांत जीव येतो, कारण शत्रु असे कधीं करीत नसतो. मग भय व आशा यांही “युक्त होत्साता व हृदय स्फुरित असतां तो पापी दार उघ- डतो. येशू आंत येतो. बंदिवानाच्या बेड्या गळून पडतात. येशूच्या प्रायश्चिताच्या रक्ताने त्याच्या वज्रप्राय पापरूप शृंखळा मेणाप्रमाणे वितळून जातात. पवित्र आत्म्याची शक्ति त्याजमध्ये प्रवेश करून त्याच्या भ्रष्टतेची बंधने तोडून टा- किते. बंदिवान बंदखलास झाला. आतां त्यांच्या मळीण