पान:बंदखलास.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५

ची व मरणाची भयंकर शस्त्रे टांगलेली दिसतात. जेव्हां तो आपल्या कोठडीच्या जमिनीकडे पाहतो तेव्हां तो तेथें येण्या- च्या अगोदर त्या आत्म्यांच्या घातकानें ज्यांचा वध केला होता त्यांची हाडे पडलेली त्याच्या दृष्टीस पडतात. आणि त्या कोठडीच्या कोनाड्यांत जे भयंकर जीव लपून बसलेले असतात त्यांच्या गुरकावण्या व अक्राळ विक्राळ रूपे त्या- च्या नजरेस पडतात. मग जेव्हां तो आपल्याकडे पाहूं ला- गतो तेव्हां त्याला आपली तुरुंगांतली वस्त्रे किती मळीण व शव फाटकी आहेत हे समजतें. तेव्हां त्याला वाटूं ला- गतें कीं, परम पवित्र परमेश्वरासमोर उभा राहण्यास मी अगदी योग्य नाही. तो मला अशा स्थितीत कधी जवळ घेणार नाहीं, मग त्याला आपल्या पापाच्या बेड्या आपल्या मासांत कशा चरंत गेल्या आहेत व कशा गच्च जिव्हारीं बसल्या आहेत हे समजते. मग त्याच्या मनांत नवीन वि- चार येऊं लागतात. तो आपल्या कोंडीचा कंटाळा करूं लागतो. ती त्याला ओंगळ दिसतो. त्याला आपलाही कि- ळस येतो. त्याला देवाच्या क्रोधाचें भय वाटू लागते. पुढे होणार क्रोध व सांप्रतचा क्रोध यांच्या विचाराने तो चरथरां कांपूं लागतो. मग़ जो सोडविणारा अद्याप बाहेरच