पान:बंदखलास.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४


मरशील'? अशा प्रकारचे शब्द कानी पडतांच तो घाबरा होतो, त्याच्या मनांत भयंकर कल्पना उठतात. आणि खो- स्त त्याला सांगतो की, “म्यां बाहेरच्या दाराचे अडसर मोडले आहेत, खीळ काढली आहे, व कुलूप उघडले आ हे, आतां तूं उठून बाहेर पड." तरी क्रोध, न्याय, व अन् नंत काळचे मरण हे शब्द ऐकून तो इतका घाबरा झाले- ला असतो की, तारणाराला आंत येऊं देण्याकरितां दर उघडण्याबद्दल ते बंद ठेवण्याकरितां तो त्याला पाठ देऊन त्याच्याशीं टेंकून उभा राहतो. त्याला वाटते की हा कोणी वाईट निरोप घेऊन आला आहे; जर ह्याने बाहेरची दारें जबरीने उघडली असली तर माझेही दार तसेच फोडून हा आंत येईल.
 परंतु स्त्रीस्त कोणाच्याही अंतःकरणांत जबरीने प्रवेश करीत नाहीं, तो कोणालाही जबरीने तारीत नाही, कोणा- लाही ओढून ताणून स्वर्गात नेत नाहीं; तर पाप्याने खुशीने आपणाला आंत घ्यावें ह्मणून तो दयाळु तारणारा अणखी उपाय योजितो. तो त्याच्या अंधार कोठडीत प्र- काशाचें किरण पाडतो, त्याच्या योगाने सैतानाचा बंदिवान आपली स्थिति पाहतो. त्याला कोठडीच्या भिंतीवर यातने-