पान:बंदखलास.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३


कळा होऊन देवाच्या पुत्रांप्रमाणे बाहेर फिरणार नाही. आणि हे करायास आमचा तारणारा समर्थ आहे. तो प्रत्येक कैद्याच्या कोडीच्या दाराशी येतो आणि ते ठोकून लणतो हे पाप्या, तुला आपली सुटका करून घेण्याची इच्छा आहे काय ? अहो पापी, तुम्ही ही वाणी ऐकतां काय ? स्त्रीस्त तुमच्या अंतःकरणाचें दार आतां ठोकीत आहे. तर तुम्ही आंतून असें ह्मणाकीं, "प्रभु येशू, माझी इच्छा आहे, " ह्मणजे तुली मुक्त व्हाल.
 परंतु जेव्हां सोडविणारा अंधार कोंडीचें दार ठोकितो तेव्हां आंत पापी गाढ झोपेत असतो; तो जागा हो- त नाहीं. तथापि हा दयाळु तारणारा त्याला सोडून, तेथून लवकर निघून जात नाहीं. तो फारवेळ दार ठोकत उभा राहतो. आणि जर त्याच्या ठोकण्याने पापी जागा: झाला तर पहिल्याने त्याच्या कानीं कोणते शब्द पड़तात ! बाहेरून त्याला असे ऐकूं येतें कीं, “तुझ्या शिक्षेचा ठराव: झाला आहे. " आणि देवाचा राग, व आज्ञाभंग, व अ. नंतकालिक मरण यांविषयींच्या गोष्टी तो ऐकतो. आणि असेंही तो ऐकतो कीं, 'मला. आंत येऊं देऊन आपली सुटका करून घेशील काय ? अथवा मला बाहेर ठेऊन,