पान:बंदखलास.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२


त्याने स्वरक्ताने रंगविलेला लाल बावटा त्या गढीच्या वरच्या भिंतीवर उभारला. आणि तो जयशाली शर वीर प्रत्येक अं- धार कोठडीतील बंदिवानास सुटका गाजवीत गेला. तर हे बंदिवाना, तुझ्या कोठडीचे दार उघडले आहे, तूं बाहेर निघतोस काय ? तें येशू ख्रीस्ताने उघडले आहे. आतां तें कोणाच्याने बंद करवत नाहीं. पण हे कोण खरें मानितो ? तुह्माला वाटले असेल कीं, सैतानाच्या तुरुंगाचा दरवाजा उघडल्याबराबर आंतील कैदी बाहेर पडण्यासाठी मोठे उतावळे झाले असतील, जो तो मोठ्या लगबगीनें दारापाशीं आला असेल व तेथें मोठी भीड जमली असेल. परंतु असे झाले नाहीं. बहुतेक कैदी आपापल्या कोंडीतच आहेत; ए- खादा दुसरा कधीमधी बाहेर पडतो.
 याचे कारण काय ? जरी बंदिशाळेच्या दरवाज्यावरील न्यायाचे कुलूप उघडले, व सैतानाचे अडसर मोडले, आ- णि तुरुंगाचा बाहेरचा दरवाजा उघडला; तरी अणखी कां- हीं करायाचे राहिले आहे. कारण प्रत्येक पापी आपापल्या कोठडीत बसलेला आहे व तो आपापल्या सांखळदंडाने बांधलेला आहे. तर ही कोठडी उघडली पाहिजे व कैद्या- ची सांखळी तोडली पाहिजे. असे झाल्याशिवाय तो मो-