पान:बंदखलास.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१


 आमच्या तुरुंगाच्या बाहेरील दाराला सैतानाचा अडसर व खीळ होती इतकेंच नाहीं, तर त्याजवर देवाच्या न्यायाचे मोठें जबरदस्त कुलूप लागले होतें. ज्या दिवशीं आदामा- ने पाप केले त्या दिवशी देवानें तें लाविले. आणि त्याची किल्ली आपल्या क्रोधाच्या समुद्रांत टाकिली. आणि जेव्हां देवाचा पुत्र सैतानाची बंदिशाळा उघडण्याकरितां आ- ला तेव्हां प्रथम त्याला या क्रोधाच्या समुद्रांत बुडी मारून ती किल्ली वर आणावी लागली. इतकें करायाला त्यास आपला जीव द्यावा लागला. पण तो मरून पुनः उठला. त्याने त्या किल्लीने ते न्यायाचे कुलूप उघडले. आणि आतां ती किल्ली त्याने मिळविलेल्या जयाची निशाणी झाली आहे; ती तो आपल्या कमरेवर बांधितो. “जो जीवंत आहे व मेलाही होता, तो मी आहे, आणि पाहा, सदासर्वकाल जींवत आहे, आणि अधोलोकाच्या व मृत्यूच्या किल्ल्या मजपाशी आहे- त.” (प्रग. १. १८).

 ह्या तारणाराला न्यायाचे कुलूप फोडतां आले नसते, तें किडीनेच उघडायाचे होतें, आणि त्या रीतीनें तें उघडल्या- चर सैतानाचे अडसर व खिळी तोडून टाकायाला स्त्रीस्ताला अवकाश लागला नाहीं. याप्रमाणे खंड देऊन व जय मिळवून