पान:बंदखलास.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०


आमचे पाप आमचे दुर्दैव असते व आमचें कुकर्म नसते, जर आह्मांला सैतानाने आमच्या इच्छेविरुद्ध पाडाव करू- न नेले असते तर येशू ख्रीस्ताला आमची सुटका करणे सोपे पडले असतें.
 परंतु आमी स्वेच्छेने पाप केले व अद्याप करीत आहो. आमच्याकडून चुकून किंवा अकस्मात् पाप होत नाहीं, तर बुद्धिपुरस्सर तें होतें. सैतानाच्या लणण्याप्रमाणे अमुक म नुष्याच्या किंवा अमुक स्त्रीच्या देवाने ओढ घेतली, ह्मणन त्याने किंवा तिने पाप केलें; पण देवाचे शास्त्र ह्मणते की, त्याने किवा तिने आपल्या अंतःकरणाच्या दुष्टपणामुळे पाप केले. पापाला शास्त्रांत कोठेही दुर्दैव ह्मटले नाही. त्याला कोठें- ही संकट किवा अवचट किंवा चूक लटले नाहीं. त्याला सर्वदा कुकर्म ह्मटलें आहे. यामुळे, ह्मणजे आह्मीं राजी- खुशीनें देवाच्या आज्ञा मोडून त्याचे ऋणी झाल्यामुळे, व समजून उमजून त्याचा अपमान केल्यामुळे आमचे तारण करणे देवाच्या पुत्राला दुर्घट किंवा कठीण पडले. सैताना- ला जिंकण्यापूर्वी याला आमचें कर्ज फेडणे भाग पडले, आणि आमच्या पापाकरितां प्रायश्चितकरणे अगत्य होतें. आणि हे सर्व प्रभु येशूने खरोखर आमच्या करितां केलें.