पान:बंदखलास.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९


प्रार्थना करितात, प्रार्थना वाचतात, नेमानें देवळांत जातात, धर्मसंबंधी विषयावर चर्चा करतात, ते त्या तुरुंगाबाहेर जो दिव्य प्रदेश आहे त्याजविषय अशा प्रकारें चर्चा करि- तात की, जणु काय ते तेथे जाणारांपैकीच आहेत. परंतु तेथे जाणारांस पापाची क्षमा व अंतःकरणाची शुद्धता पा- हिजे हे त्यांस समजत नाहीं. त्यांची त्यांस गरज दिसत नाही. तर ही कोठडी तुरुंगाच्या बुरजाच्या उंच मजल्यावर अस ल्यामुळे त्यांस वाटते की आपण विमानांत बसून आकाश- मार्गाने दिव्य नगराप्रत जात आहो.

३. – बंदखलास.

 मनुष्याचे तारण करणें हैं सोपे काम आहे असे कि- त्येक्रांस वाटते, परंतु ज्याने खरोखर ते साधले त्याला मोठा प्रयास पडला. येशू स्त्रीस्त हा पापी मनुष्यांचा तारणारा तो देवाचा पुत्र होता, ह्मणून त्याला मनुष्यास सैता- नाच्या वळकट गढींतून सहज काढितां आले असते. परंतु मनुष्य केवळ सैतानाच्या बंदिशाळेत आहे इतकेच नाहीं, तर बंदिशाळेभोवती ईश्वरी न्यायाच्या गरादी आहेत. जर