पान:बंदखलास.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८


शा बंदिशाळेला पाहरेकऱ्याची गरज नव्हती. ही जागा निराशेच्या बंदिशाळेची योग्य उपमा आहे.
 सैतानाच्या बंदिशाळेत एकच जागा आहे असे नाहीं. तिच्यांतील सर्वच कोठड्या अंधाराच्या व गाळाच्या नाहीत. कित्येकांस चांगला रंग दिला आहे व नामी आराश केली आहे. त्यांत बसायास मऊ गाद्या, व टेंकायास नरम लोडे आहेत. तेथें खाण्यापिण्याचे गोड व स्वादिष्ट पदार्थ आहेत. त्यांत राहणारांच्या मनरंजनार्थ मंजूळ गाणे व बजाविणे चा- लले असते. अशा कोठड्यांपैकी “वैराग्यशून्य निर्भयता " नामक एक हवाशीर व प्रशस्त कोठडी आहे, ती मोठ्या राजकीय कुळांतील पुरुषांसाठी व खानदानीच्या लोकांसाठी केली आहे. ह्या कोठडींत रिव्रस्ती धर्माचा उपदेश ऐकत असतांही जे त्याप्रमाणे चालत नाहींत असे ख्रिस्ती मंडळीं- तील लोक आहेत. तींत कोणी मूर्तिपूजक नाहीत; ते खा- लच्या अंधार कोंडीत आहेत; त्यांची ह्या वरच्या कोठडीत- ल्यांस फार दया येते. ह्या कोठडीच्या खिडक्यांतून बाहेरील सुंदर प्रदेश दूरवर दिसतो. त्याजकडे जेव्हां हे बंदिवान पाहतात तेव्हां ते आपण सैतानाचे कैदी आहों हे विसरतात. त्यांस तेथील सर्व सुखोपभोग फार आवडतात. ते पवित्र शास्त्र वाचतात,