पान:बंदखलास.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७


व त्यांचे आचरण फार लाजीरवाणे आहे. काम, क्रोध, मद, मत्सर, भांडण, चोरी, लबाडी, देवानंदा, धर्म निंदा, प्रपंच- लुब्धता, द्रव्यलोभ, क्रूरता, निर्दयता, इष्कबाजी, जुवेबाजी, दारूबाजी, यांत ते गुंग असतात.
 परंतु ह्या बंदिशाळत अणखी एक खांच आहे, तिचें नांव " निराशा." ह्या खांचेंत सैतान मोठमोठ्या पाप्यांस ठेवितो. वहतकरून ते मरायाच्या लागास आले ह्मणजे त्यांस तो तेथें घालितो. कारण जे पापाचरण करीत राह- तात ते निराशेने मरतात. अशांस सैतान ह्मणतो कीं, तु- ह्मांवर देव दया करणार नाहीं. तुमची पापें भारी आहेत. तुह्मी कितीही पश्चात्ताप केला तरी कांही होणार नाहीं. जार्ज विशार्ट नामक ईश्वरभक्ताला त्याच्या शत्रूनी बंदिशाळेत टाकिले होते. ती बंदिशाळा खडकांत खोदलेली गुहा होती. तिचे तोंड मनुष्य जाईल इतकें रूंद होते. परंतु त्यांतून एकदां मनुष्यास जबरीने आंत घातले ह्मणजे तो एका खो- ल खांचेंत पडत असे. तेथे त्याला निजण्या पुरती मात्र जागा होती. ही गुहा वर चिंचोळी होत गेली होती. ह्या बंदिशाळेच्या भिंती केवळ खडकाच्या होत्या, आणि तिचे वरचे तोंड लोखंडाच्या जाड गरादींनी बंद केले होते. अ-