पान:बंदखलास.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६


खांचेतील बंदिवान जितके खरोखर सुटतात तितके या कल्पित मोकळिकेत आलेल्या पैकीं सुटत नाहींत.

 ह्या बागांतील कैदी सर्व स्वकर्माभिमानी आहेत. सभ्य- ता, उद्योगशीलता, प्रामाणिकपणा व नेमस्तपणा यांकडून आपले तारण होत नाहीं अशी त्यांची खातरी झालेली अ- सते. आपल्यास अणखी कांहीं पुण्य असावे अशी इच्छा त्यांस उप्तन्न होते, पण सैतान त्यांस सांगतो कीं, पश्चात्ताप करा, प्रा- धंना करा, माळ जपा, उपास करा, व्रतें पाळा, दानधर्म करा, शास्त्र पठण करा, तीर्थ यात्रा करा, देह दंडन करा, कांदे, वांगी, मांस, इ० अभक्षभक्षण सोडा; जातीभेद कड- कडीत पाळा, गोत्राह्मणसेवा करा, पुराणकीर्त्तन श्रवण करा, गोसावी, सन्याशी व्हा, वनवासी व्हा, वेदांतविचार करा, ह्मणजे तुझी धार्मिक व्हाल. ह्या सूचनेप्रमाणे ते वतूं लागतात; परंतु ते फसतात. सैतान त्यांस त्या बागाच्या बाहेर जाऊं देत नाहीं.
 आतां ज्यांस सैतानाने मोठ्या खोल व अंधाराच्या खां- चेत कोंडून ठेविले आहे, त्याकडे आपण क्षणभर पाहूं. अशा कैद्यांची संख्या फार मोठी आहे. ते नाना प्रकारच्या विषय- वासनांचे गुलाम आहेत. त्यांच्यामध्ये अनेक दुर्गुण आहेत,