पान:बंदखलास.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५

मार्ग " असेही ह्मणतात. तो "पवित्रतेच्या राजमार्गाच्या" न- मुन्यावर बांधला आहे, परंतु त्याजवर जे सरड, सर्पादि अ- शुद्ध जीव रांगत फिरतात त्यांवरून तो शुभवर्त्तमानाचा - त्र मार्ग नव्हे असे तेव्हांच समजतें. कारण देवाच्या मार्गा- विषयीं असे लिहिले आहे की, "अपवित्र त्यांत चालणार नाहींत " ( यशा० ३५०८).

 ह्या बागांत ज्यांला सैतान " न्यायी पणाची फळे " ह्न- णतो तीं पुष्कळ आहेत. ज्या झाडांवर हीं फळे आहेत ती दुरून सुंदर दिसतात, परंतु ती केवळ कृतीचीं आहेत. त्यांस रंगविलेली फळे व कागदाची पाने चिटकवलेली आहेत, आणि तीं निर्मूल असून जमिनींत रोवलेली आहेत, तीं स- जीव विश्वासाच्या मुळापासून वाढलेली नाहींत अशी निर्जी- व कर्मे आहेत. अशा निर्जीव कर्माच्या बागाभोवती “ढोंग" किंवा “दांभिक भक्ति" नांवाचें दाट कुंपण आहे. ह्या आवा- राच्या आंत "सुभक्तीचा आकार" नांवाचा बाग आहे. त्यां त ज्यांस नीतीच्या कोठडीत चैन पडत नाही, अशा आप- ल्या बंदिवानांस सैतान जाण्याची मोकळीक देतो. परंतु ह्यां- विषयीं असे समजण्यांत येतें कीं, अनेक विषयवासनारूप