पान:बंदखलास.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४


भले गृहस्थ आहां, तुझी कोणाचें देणे ठेवीत नाहीं, को- णाच्या आगीदुगत पडत नाहीं, कोणाशीं तुमचें तंटा- भांडण नाहीं, तुल्लो लोकांशीं ममतेने वागतां, तुह्मी सभ्य व परोपकारी आहां, तुह्मी विद्वान, वजनदार, सुशिक्षित व सुज आहां, यांपेक्षां तुह्माला काय अधिक पाहिजे ! अतिभक्त होण्यांत काय लाभ आहे ?

 परंतु जर करितां त्या सफेदी दिलेल्या नीतीच्या को- ठडींतही एखादा पापी मनुष्य बेचैन झाला तर सैतानापा- शीं आणखी एक उपाय आहे. तो त्याला ह्मणतो, बाबारे, " जर तूं ह्या बंदिशाळेतून जात असलास, तर जा कसा ?" असें ह्मणून तो बंदीशाळेचें दार उघडून त्याला बाहेर जाऊं देतो, त्या मनुष्याला वाटते की आतां मी मुक्त झालो. पण त्या बंदिशाळेच्या बाहेरच तोंडाशी एक सुंदर बाग आहे, त्याचे नांव "सुभक्तीचा आकार." ह्या बागाची मांडणूक व रचना देवाच्या बागाप्रमाणे आहे खरी, पण तो केवळ ब- नावट आहे. तो मायेचा बाग आहे. त्यांतील रस्ते " नवीन आज्ञापालनाच्या" रस्त्याप्रमाणे केले आहेत, पण ते नर- काकडे जातात. तेथें एक दुतर्फा झांडाच्या मधून रस्ता आहे, त्याचे नांव " कर्म मार्ग," त्याला कोणी "स्वपुण्य