पान:बंदखलास.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३


जी नाहीं. त्यानें देवाला मानिलें नाहीं व स्त्रीस्ताला अंगी- कारिलें नाहीं ह्मणजे तो त्याजविषयीं संतुष्ट असतो. तो कोणत्याही कोठडींत कां असेना, तो बंदिशाळेत असला ह्मणजे त्याला बस आहे. आपला कैदी गाळाच्या खाचेतून परमेश्वराचे नांव घेऊन आरोळी ठोकील ह्याचें त्याला मोठे भय असते, ह्मणून तसेच कांहीं चिन्ह दिसूं लागले तर तो त्याला सदाचरण नामक रंगीत खोलीत नेऊन ठेवितो, आ- णि त्याला ह्मणतो की, “एथे राहा, ह्मणजे तुझ्या जिवाला सुख वाटेल. मितभाषी, मितभोजी, मितव्ययी हो, इंद्रियें स्वाधीन ठेव, शहाणपणाने वाग, उद्योग कर. संसारांत अब्रूने वाग, ह्मणजे तुझे कल्याण होईल." अशा ठिकाणी तो कैदी कांहीं दिवस राहिल्यावर व तेथें त्याला किंचित स्वस्थ वाटू लागल्यावर तो त्याजपाशी येऊन ह्मणतो, खरें- च तुमच्या सारख्या नाजूक प्रकृतीच्या गृहस्थास त्या खोल खांचेंतील ओलसर व खराब हवा मानवली नाहीं, यांत आ- श्वर्य नाहीं. तेथे तुह्लाला सोबतही चांगली नव्हती. तुझी कुलीन व सभ्य गृहस्थ आहां, तेव्हां मळीण व हलकट लो- कांमध्ये तुलाला ठेवणे योग्य नाहीं. परंतु एथे सर्व तुमच्या मनाजोगते आहे. एथे तुह्मी सुखाने राहाल. तुली फार