पान:बंदखलास.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२


पैसा मिळीव. जर तुला उघड रीतीने देवनिंदा करणे आ- वडत नसले तर देवभक्तांची निंदा कर. तुला मूर्तिपूजा करणे बरे वाटत नसले तर द्रव्यलाभ धर. सारांश, तुला माझ्या कैदेत राहिले पाहिजे, मग तूं हलके पाप कर किंवा भारी पापकर, उघड रीतीने कर किंवा लपून कर. द्रव्याची चोरी करणे बरे वाटत नाहीं तर कामाची चोरी कर, वेळेची चोरी कर, आळसांत आयुष्य घालीव. जर तुला दारूने मस्त होऊन गटारांत पडणे आवडत नसले तर छाकटा होऊन पलंगावर लोळत राहा. जर तुला खून करून फाशी जाणे आवडत नसले तर गोरगरीबाला जांचून मजा मार.
 तुला दारू आवडत नसली तर गांजा पी, अफू खा. तुला खोटे रोखे करणे नको तर खोटी शपथ घे. आईबापांचा अपमान करणे बरे वाटत नसले तर बायकोला मारहाण, शिवीगाळ करीत जा. शत्रुचा जीव घेणे बरे वाटत नसले तर मित्राची उपेक्षा कर. सारांश, तुला कसेही करून माझ्या कैदेत राहिले पाहिजे. मी तुला सुखी व स्वस्थ ठेवायास मान्य आहे. असा सैतानाचा आपल्या कैद्यांविषयों मतलब आहे.
 मनुष्य कोणतेही पाप करो, त्याविषयीं सैतानाला काळ-