पान:बंदखलास.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११

शीर आहे. जो तो आपापल्या जागी दांडगाई न करितांBR स्वस्थ राहील अशा रीतीने ठेवलेला आहे, तरी ते सर्व कै- दीच होत. त्यांच्या कोठड्यांच्या दाराला लोखंडाचे अडसर, त्यांच्या खिडक्यांस लोखंडाचे गज व त्यांच्या भोवती पित- ळेच्या भिंती आहेत. त्यांनी कांहीं गडवड न करितां स्व- स्थ राहावें हें सैतानाला आवडते. त्यांनी आपल्या अटके- तून सुटून जाण्याचा यत्न करूं नये ह्मणून जेथे त्यांच्या जिवाला गोड वाटेल अशा ठिकाणी तो त्यांस फिरवीत असतो.
 जर कोणी कैदी गाळाच्या खांचेत बेचैन होऊन ओरडूं

लागला तर सैतान त्याला जेथे पाणी नाहीं अशा एखा-

द्या कोरड्या टांक खांचेंत नेऊन ठेवितो.ज्या कैद्याला मळीण विषयसुखाचा कंटाळा येतो त्यास तो लगतो कों, ज्याचा तुला फार त्रास येणार नाहीं असे एखादें पाप करीत जा. जर तुला निर्लज्ज रीतीने विषयलंपटपणा करायाला बरे वाटत नाहीं, तर नाच तमाशे पाहायाला जा. तुला जर चोऱ्या करून किंवा दरोडे घालून धन मिळविणे प्रशस्त वाटत नसले, तर व्यापार धंद्यांत ल बाड़ी करून किंवा सरकारी कांमात लांचलुचपत घेऊन