वाजेघर गावाच्या वाटेवर सीताबाई झपाझपा चालत राधाच्या घरापर्यंत
पोहोचल्या. हाश-हुश करत पाण्याचा तांब्या संपवून त्यांनी खाली ठेवला.
"काय राधा, काल झालं ना बँकेतलं सगळं काम? भरले का चेक दोन्ही
गटांनी?" त्यांनी राधेला विचारले.
“नाही ताई, त्या बँकेचं आम्हाला काही खरं वाटत नाही. मी वाजेघरावरनं
बँकेत पोहोचले अन् कुसुम पाल गावावरून आली होती. दोघींनीही तुम्ही
सांगितल्यावानी चेक घेतले अन् स्लिप भरली. बरं झालं बँकेत भरण्यापूर्वी
आम्ही बघितलं ते! अवं ताई, माझा चेक होता ५,०००/- रू. चा अन् कुसुमचा
होता १0,000/- रू. चा, बघतो तर काय? दोघींचे चेक सारखेच! आकार,
रंग, चेकवरच्या सह्या समदं सारखंच. मी म्हंनलं काहीतरी भानगड आहे.
म्हणून आम्ही चेक भरलं न्हाईत"
“अगं पण झालं काय?" सीताबाई म्हणाली......“ताई, नोटा कशा
वेगवेगळ्या आकाराच्या अन् रंगाच्या असतात का न्हाई? ५00 रूपयाची ची
मोठी, १00 रूपयाची त्यापेक्षा छोटी दिसती का न्हाई? मग हे चेक ५,000
चा अन् १0,000 रूपयाचा, तरी सारखेच कसे? म्हंटलं आम्हाला कुणी
फसवायला नको, म्हणून चेक भरलेच नाहीत."
बँकेत भीमाबाईचं खातं राधाच्या ओळखीमुळे निघालं, हे राधाने तिच्या फॉर्मवर सही केल्यामुळे भीमाबाईला कळलं. गावाकडे येताना राधाला भीमा म्हणाली, 'आता तुझ्या ओळखीनं खातं निघालं म्हणजे तुला दर बारीला माझ्या सोबत यायला हवं. नायतर मला कोण ओळखणार बँकेत?' न रागावता राधा म्हणाली, 'नाही आत्या तुमचा फोटो लावला आहे ना? मग मी नसले तरी