पान:बँकेत पाऊल टाकण्यापूर्वी (Banket Paul Takanyapurvi).pdf/३२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गिर्हाइकामध्ये बँक फरक करते ही नवीन माहिती करून घेतली पाहिजे.
 जीवन जगण्यासाठी लागणारं असं पैशाच्या व्यवहाराचं शिक्षण ना पुरुषांना कधी मिळतं ना महिलांना!... त्यामुळे शिकायला असं हवं कि वेळेत ठरलेला हप्ता भरला कि ‘कर्ज आहे' याचा संकोच बाळगायची गरज नाही बँकेचे किंवा गटाचे कर्ज सन्मानाच कर्ज असते ते घ्यायचे नि चोख फेडायला फेडायला शिकायचे! असे केले की बँकेची मदत घेतली तर राजकीय पुढार्याच्या मदतीशिवायही आपण आपापली परिस्थिती सुधारू शकतो हे नव्याने ग्रामीण जनतेला समजले.
 अशा बँक व्यवहारामुळे उत्पादक कर्ज व इतर कर्ज यातला फरक महिलांना समजू लागला. बँक व्यवहारामुळे आता बचत गटातल्या या महिला उत्पादक कर्जाचं आर्थिक गणित समजून, बँकेच्या कर्जाची फेड हा खर्च नाही तर गुंतवणूक आहे असं कळू लागलं. कर्जाच्या व्याजाचा दर योग्य असतो हे विचारात घेऊन, कर्ज देणा-या बँकेची भूमिका समजल्यावर गटात मोठमोठ्ठाली कर्ज मागायला लागल्या. चारचौघीसमोर कर्ज घ्यायला पूर्वी वाटणारी लाज आता वाटेनाशी झाली, कर्जाची मागणी व्हायला लागली, तशी चोख वेळेत हप्त्या- हप्त्यानं परत फेडही व्हायला लागली. हे सारं समजून करायला तपापेक्षा जास्त काळ लागला! त्यामुळे आता त्याच महिला, बँकेतून काही लाखाची कर्ज हसत हसत घेतात आणि घेतलेलं कर्ज ‘आवाक्यातल आहे' असं म्हणून शांत झोपतातही!

याच साठी केला होता अट्टाहास..........

 आयुष्यात पहिल्यांदाच आज सावित्रा ही तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या कॉलेजमध्ये पाऊल टाकत होती. तिच्या लेकीने,भाग्यश्रीने वक्तृत्व स्पर्धेत बक्षीस मिळविले होते. त्याचा बक्षीस समारंभ होता. माणसांनी गच्च भरलेल्या हॉलमध्ये भाग्यश्रीचे नाव पुकारल्यावर ज्या सहजपणाने ती माईकसमोर उभी राहीली आणि अत्यंत धीटपणाने तिचे विचार मांडू लागली ते पाहून सावित्राचे डोळे भरून आले. तिला पुढचे काहीही दिसेनासे झाले. तिचे मन भूतकाळात हरवले.......
 सासरी आल्यापासून जणू गाड्याला जुंपलेल्या गुरासारखी संसाराचा गाडा ओढणारी सावित्रा कधी माणूस नव्हतीच! तिला तिची स्वतःची ओळखच नव्हती. घरातील मोठी माणसे आणि शेतावरील-घरातील काम यांची ऊठबस करणे हेच तिचे काम. तिला घरातही काही किंमत नव्हती. ना घर तिच्या