कोणाचेही कधीच शिक्षण झालेले नाही आणि त्यामुळे किती कर्ज घ्यावे? कधी
घ्यावे? कोणाकडून घ्यावे? काय दराने घ्यावे? कुठल्या योजनेतून घ्यावे?
अशा कुठल्याही विषयाची कोणालाच पुरेशी माहिती नाही.... म्हणजे महिलांनाच
माहिती नव्हती असं नाही तर पुरुषांनाही ही माहिती नव्हती. बहुतेक जण
जाहिरातीतूनच काय ते शिकत होते! कर्ज हा विषय अतिशय महत्वाचा असून
सुद्धा ग्रामीण भागात त्या बद्दल कमालीची गोपनीयता बाळगली जायची आणि
या अशा गुपचुपच्या व्यवहारामुळेच नेमके फसायला व्हायचे. कर्ज घेणा-याला
आपण कर्ज घेतले आहे हे कधीही कोणालाही कळू नये असेही वाटत
असायचे. कर्ज घेणे ही सन्मानाची गोष्ट तर कधी कोणाला वाटलीच नाही.
एकदा एका बैठकीत महिलांना विचारले ‘तुम्हाला माहित असणा-या
श्रीमंत लोकांची नावे सांगा' तर 'टाटा, बिर्ला, अंबानी' अशी बरीच नावे
महिलांनी सांगितली मग विचारले त्यांच्या नावावर कर्ज असेल का?'
महिला लगेच म्हणाल्या ‘अर्थातच नाही! त्याना कर्जाची काय गरज?'
त्यांनी ठामपणे उत्तर दिलं. जेव्हा मी त्यांना सांगितलं, 'असं काही नाही,
त्यांच्यावर कर्ज असूही शकेल! ....आणि समजा नसेल तर बँक त्यांच्यापाठी
‘कर्ज घ्या' ‘कर्ज घ्या' असं म्हणत मागे लागत असतील, असं मला वाटतं!'
....क्षणभर शांतता पसरली....... 'हो बँकांना खात्री आहे ते
श्रीमंत असल्यामुळे कर्ज नक्कीच फेडतील' एक जण बँकेची भूमिका
‘समजून' बोलली....'बरोब्बर! अगदी बरोब्बर! म्हणजे कर्ज घेणं हे वाईट
नाही पण ते फेडता येण्याची पात्रता सिद्ध करता येणं महत्वाचं म्हणजे
आपण कर्ज फेड करू अशी आपली बाजारात पत तयार करणं महत्वाचं.
जी महिला गटाच्या नियमाप्रमाणे नियमित कर्जफेड करते
तिला कुठल्याही अडचणी शिवाय पुढचं मोठं कर्ज मिळत. 'कर्ज
घेणं वाईट' हा समज मनातून काढून टाकायला हवा!....
सरसकट कर्ज घेणं वाईट नसतं. माफक दारानं कर्ज घेतलं आणि
योग्य प्रकारे खर्च केलं तर घेतलेलं प्रत्येक कर्ज आर्थिक परिस्थिती
सुधारायला उपयोगी पडतं, पण बेताबेतानं घ्यायचं.... पत वाढवत
वाढवत पुढे सरकायचं.' त्यावर एक जण म्हणाली, 'बँकेतून घेतलेलं
कर्ज सरकारनं ‘माफ केलं' म्हणून फिटलं असं ज्यांच होतं त्यांची वेगळी
यादी बँकेकडे असते का?' तर हो! आता बँकेच्या चोख आणि फसव्या
पान:बँकेत पाऊल टाकण्यापूर्वी (Banket Paul Takanyapurvi).pdf/३१
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.