म्हणून विमा काढायचा असे केले की त्यालाच म्हणतात आर्थिक साक्षर!
४ म्हातारपणाची सोय: रोजचा गाडा ओढता ओढता पुढंच बघून
आपल्या म्हातारपणाची सोय करणे हे फार महत्वाचे असते. जेंव्हा
हात पाय हलणार नाहीत तेव्हाही जगायला खर्च येणार आहे तो कसा
भागवायचा याचा वेळेत विचार केलेला बरा. आपल्याला लागणा-या औषध
पाण्यासाठी चार पैसे बाजूला पडलेले असलेले बरे हे नेहेमी लक्षात ठेवायला
हवे. या पैशाला मी कधीही हात लावणार नाही असे म्हातारपणासाठी पैसे
बाजूला ठेवलेले असायला हवेत असे जो करतो तो स्वतःसाठी आर्थिक
नियोजन करू शकतो असे म्हणतात यालाच आर्थिक साक्षर म्हणतात!
या चार गोष्टीचा विचार करायला हवा. ‘मला कधी काही होणार नाही'
असे होणे नेहेमीच चांगले पण काही झालेच तर...पैशाची सोय असलेली बरी. असा
विचार नेहेमी करायला हवा. आज हातात चार पैसे आले तर त्यातला एखादा तरी
बाजू टाकावा तरच उद्याची सोय होईल हे कायम लक्षात ठेवेलेले बरे. असा विचार
करून गरज नसलेल्या गोष्टीवर पैसे खर्च करताना हात आखडता घेणे चांगले.
सुरुवाती सुरवातीला बचत गट, हिशोबाला बसला कि गटातल्या सभासद
महिला महिन्याची महिन्याला न चुकता बचत करायच्या पण गटात पैसे
जमल्यावर गट चालू असताना कोणीच कर्जाची मागणी करायच्या नाहीत.
बचत गट बैठकीच्या आधी किंवा नंतर खाजगीत येऊन कर्जासाठी प्रमुखाला
भेटायच्या. पण सर्वांसमोर व्यवहार झाले नाहीत म्हणून अनेकींना कधी कर्ज
मिळायचे नाही. गरज असायची पैसेही असायचे पण तरी पैसे तसेच पडून
रहायचे. गट चालू असताना कोणीच का बरं कर्ज मागत नव्हतं? तर कर्ज
हवे होते पण गटात सगळ्यांसमोर कर्जाची मागणी मांडायचा संकोच होत
होता....... कारण ‘गरजेला आवश्यक तेवढे कर्ज घ्यावे' असा संस्कार
कोणावरंच झालेला नव्हता. संस्कार असा होता तो ‘कर्ज घेणे अतिशय वाईट' !
‘कर्ज' हा दारिद्रयाचा कळीचा मुद्दा असूनही 'कर्ज' या विषयावर