पान:बँकेत पाऊल टाकण्यापूर्वी (Banket Paul Takanyapurvi).pdf/१७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
बदलता व्याजदर
अनुभव १0

 बँकेत गेलेली शोभा परत संस्थेच्या कार्यालयात येताना लांबूनच आशाला दिसली होती. ती जवळ येताच काहीतरी दुखतंय हे त्यांना समजलं होतं. गार पाणी पिऊन थोड्या शांत झालेल्या शोभाला आशाने विचारले, “काय मग आज चेहरा काअसा दिसतोय?" आशासमोर बँकेचं पासबुक टाकून शोभा म्हणाली, “ताई, व्याजाचं गणित काही कळेना झालंय, मागच्या वर्षी बँकेने जे व्याज आपल्या गटाकडून घेतलं होतं, त्यापेक्षा जास्ती दराने ह्यावर्षी व्याज घेतलंय त्यांनी."
 आशाच्या लक्षात काय घोटाळा झालाय ते लक्षात आलं. बचतगटाचा व्याजदर हा एकदा ठरला की गट फुटेपर्यंत तोच असतो. पण बँकेच्याबाबतीत तसे नाही. कर्जावरील व्याज किती घ्यायचे हे बँकेतील संचालकांच्या बैठकीत ठरते. तो व्याजदर शासनाच्या धोरणाप्रमाणेसुद्धा बदलू शकतो. त्यामुळे तो बदलला तर गटाला परवडणार की नाही याची खातरजमा करायची. हे गणित शांताला समजावून सांगता-सांगता संध्याकाळ कधीच झाली. आशाच्या लक्षात आले. आता गटांच्या प्रशिक्षणात एका नवीन मुद्याची भर पडणार होती........ बँकेचा कर्जावर आकारण्यात येणारा व्याजदर हा बदलू शकतो. तो गटाप्रमाणे स्थिर नसतो. कर्ज घेण्यापूर्णी सभासदांना बँकेच्या अधिका-यांनी हा मुद्दा सांगितला तर त्यांना तो समजणे सोपे जाईल. बँक बदललेला व्याजदर बँकेत फलकावर लावते, प्रत्येक गटाला ती कळवेल असे नाही.