Jump to content

पान:बँकेत पाऊल टाकण्यापूर्वी (Banket Paul Takanyapurvi).pdf/१०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझं नाव लिहिलंस तर मलाही मिळतील. पण आता एक लक्षात ठेवा बँक काही तुझे मालक म्हणून त्यांना तुझ्या खात्यातले पैसे देणार नाही. एवढच काय तुझ्या नावात त्याचं नाव लपलं असलं ....ते तुझे मालक असले तरी पण तुझ्या खात्यात किती पैसे आहेत हे बँक तोंडाने सांगणार सुद्धा नाही.' आता मात्र भिमा आत्याचा चहा गारच झाला. तिला कानांन ऐकू येत होतं सगळं पण मन मानत नव्हतं. आज पर्यंत मालका शिवायच्या स्वतःच्या अशा वेगळ्या अस्तित्वाचा तिने कधी विचार सुद्धा केला नव्हता. हे काहीतरी अघटितच झालं, अस तिला झालं. झालाच आपला अभिमन्यू! असंही क्षणभर वाटून गेलं.... तो तिच्या चेह-यावरचा भाव राधानं नेमका टिपला नि म्हणाली, 'हीच वेळ आहे आत्या, चार पैसे बाजूला टाका. अडीनडीला तुम्हालाच उपयोगी पडतील. तुमची मर्जी होईल तेव्हा काढा. कोणी जबरदस्तीने नाही काढू शकणार तुमचे पैसे. पैसे बँकेत टाकले कि कोन्नाकोन्नाला कळणार सुद्धा नाही. तुमच्या खात्यात कोणीही पैसे टाकू शकतं म्हणजे दर बारी तुम्हाला बँकेत यायला नको मी गटाच्या कामासाठी जातेच बँकेत तेव्हा तुमच्या खात्यात पैसे टाकू शकते पण अजून आपण तुमच्या खात्याचा चेक घेतला नाही म्हणून पैसे काढायला मात्र तुम्हांलाच यायला हवे कारण तुमची तिथे सही हवी.' भीमा आता कुठे समजून म्हणाली, '.... आता मी साहेबीन झाले म्हणायचं!. माझ्या सही शिवाय अडणार तर सगळं... यांना म्हणून नको होतं तर मी बँकेत जायला. बरं झालं सांगितलं नायतर म्या अडाण्याला कोण सांगणार. बचत गटात आले म्हणून कळतंय सारं

सही म्हणजे काय?
अनुभव ५

 बँकेतून फुणफुणतच संगीता संस्थेच्या कार्यालयात आली. “काय गं संगीता, बँकेत काम झालं नाही जणू!" भारतीताईंनी तिला विचारले. “अवं तुमचा तो बँकेतला संगणक, तो मला वळखीत न्हाई म्हणे! जळलं त्याचं लक्षण!" संगीता म्हणाली, “बर, मला शांतपणे सांगशील का सगळे?" भारती म्हणाली.
 “मी बँकेत गेले.भरलेली स्लिप त्यांना दिली तर ते म्हणतात, 'तुमची ही सही नाही.' याला काय म्हणायचं ताई?" “बर, पाहू बरं मला ती स्लिप." भारतीताईंनी