पान:बँकेत पाऊल टाकण्यापूर्वी (Banket Paul Takanyapurvi).pdf/११

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्लिपवरील सही पाहीली. तिने सही केली होती, 'संगीता आप्पा वाशिवले'. "अगं संगीता, तुझी सही 'संगीता किसन वाशिवले' अशी केवढी छान घटवून तू तयार केली होतीस ! आणि इथे संगीता आप्पा वाशिवले काय केलीस?" "मग, त्यांनाच आप्पा पण म्हणतात हे ताई ठावं न्हाई व्हंय् तुम्हाला?" “आता काय म्हणावं तुला संगीता, अग त्या संगणकाला कसे कळेल की किसन म्हणजे आप्पा ते!"

बँकेसाठी खाते काढताना जी सही केलेली असते,
तीच आणि तशीच सही ही आपली ओळख असते.
आपण चेहरा पाहून जसे माणसाला ओळखतो तसेच
बँकेतला संगणक सही च्या फोटोद्वारे तुम्हाला लक्षात
ठेवतो म्हणून आपली सही अगदी जशीच्या तशीच
करायची असते.


बेअरर व क्रॉस चेक
अनुभव ६

 शारदानं केलेले पापड ती कोप-यावरच्या हनुमान लॉजला नियमित पुरवत होती. हनुमान लॉजचा हनुतात्या तिला त्याचे पैसेही वेळेवर द्यायचा. एकदा त्यानं शारदाचं खात बँकेत आहे असे कळल्यावर तिला ३000 रूपयाचा चेक दिला. शारदा तो चेक घेऊन तशीच बँकेत गेली. तिने मॅनेजरला त्याचे पैसे मागितले. मॅनेजरने सांगितले, “चेक क्रॉस आहे. वठला की पैसे मिळतील".
 शारदाला मॅनेजरचे बोलणे समजले नाही. फक्त पैसे मिळणार नाहीत एवढेच समजले. मॅनेजर म्हणत होते बँकेत चेक भरा. तरी त्यांचे काहीही न ऐकता ती तो चेक घेऊन घरी आली. संध्याकाळी पुन्हा हनुकडे गेली. म्हणाली, “बँकेत पैसे नव्हते तर चेक कशाला दिलास?" हुनु म्हणाला, “कुणी सांगितलं बँकेत पैसे नाहीत? आहेत की!" तिने घडलेला प्रसंग सांगितला. मग हनुनं तिला समजावून दिलं. तो म्हणाला, “आक्के, अगं माझ्याकडे तुला द्यायला रोख पैसे नव्हते. या वेळेचे बिल मोठे होते. उगाच पैसे अडकायला नकोत म्हणून मी तुला चेक दिला. पण मी तो 'क्रॉस' केला होता. याचा अर्थ तो तुझ्या खात्यातच भरायला हवा मग माझ्या खात्यातून पैसे तुझ्या खात्यात गेले की तुला