या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
31 फुलतील. बागेत गुलाब व मानवी जीवनात गुलाब. बाहेर गुलाब फुलतील, घरात गुलाबी गालांची निरोगी मुले हसतील. आनंद, सर्वत्र आनंद पसरणे, केवढे थोर काम. हेच काम करू दे. हे काम करीत मरू दे. किती उदार व सुंदर विचार मनात आला. किती पवित्र व धन्यतम हा क्षण. हे क्षणा, किती तू सुंदर किती पुण्यपावन जाऊ नकोस. तुला पकडू दे. तुला माझ्या जीवनात अमर करू दे थांब. " परंतु असे शब्द माधवाच्या तोंडून बाहेर पडताच तो मरून पडला. माधवाचा आत्मा निघून गेला. कोठे गेला ? सैतानाकडे का परमेश्वराकडे ? गोन्गो-४....७ पुन्हा घरी ९७