रुव र्गा त
- *
माधवाचा आत्मा नेण्यासाठी देवाचे दूत आले व सैतानाचेही दूत आले. देवाचे दूत व सैतानाचे दूत ह्यांची लढाई सुरू झाली. परंतु इतक्यात सैतान तेथे आला. 46 'हा आत्मा माझा आहे. कराराप्रमाणे माझा आहे. " सैतान म्हणाला. करार नीट पाहा. हा क्षण सुंदर आहे, किती पवित्र आहे. हा क्षण माझ्या जीवनात अमर होवो असे त्याने म्हटले खरे. परंतु ज्या विचारात मग्न असता हे शब्द उच्चारले गेले, ते विचार तुमचे आहेत का ? तुमच्या पोतडीत तसले विचार आहेत का ? आजपर्यंत तुम्ही ह्या आत्म्यावर नाना प्रयोग केलेत. परंतु ' हा क्षण अमर होवो. हे खरे सुख ' असे शब्द त्याच्या तोंडून तुम्हाला काढता आले का ? खरे सांगा, जो क्षण अमर होवो असे ह्या आत्म्याने म्हटले तो क्षण देवी होता. तो क्षण देवाचा होता, सैतानाने दिलेला नव्हता. म्हणून हा आत्मा देवाचा आहे. देवतांचा नायक म्हणाला. " खरे आहे तुमचे म्हणणे. न्या त्याला. " सैतान म्हणाला. सैतानाचे दूत निघून गेले. देवदूतांनी माधवाच्या आत्म्याला सुंदर शरीर दिले. सुंदर वस्त्रे दिली. वाजतगाजत त्याला नेले. एका लढाई- तील जणू तो विजयी वीर होता. शेवटी देवाचा झेंडा त्याने उच केला. माधवाचे स्वागत करायला मधुरी तेथे उभी होती. किती पवित्र, प्रसन्न व मधुर असे हास्य तिच्या तोंडावर होते ! दोघे भेटली. दोघे प्रभूच्या पाया पडली. प्रभूने दोघांना जवळ घेतले. त्याने त्यांच्या पाठीवरून, डोक्यावरून मंगल हात फिरविला. ९८ फुलाचा प्रयोग Si