पान:फुलाचा प्रयोग.djvu/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एक विचारायचे आहे. 'विचारा. " " माझी सत्ता तुम्ही मान्य करता की नाही ? “निराशेची सत्ता ? छट्. बिलकूल नाही. एकदा जीवनात निराशा जरा डोकावली होती. परंतु दिली तिला खोल दरीत लोटून. निराशेच्या झिज्या धरून तिला मी हाकलून दिले आहे. निराशा मला ठाऊक नाही. निराशा गेली. तिसरी बहीण आली. तिचे डोळे खोल गेले होते. नाकाचा गाडा दिसत होता. 16 26 " 68 काय आपले नाव ? " माधवने विचारले. चिंता. " काम काय ?

66 एक विचारायचे आहे. "विचारा. " " माझी सत्ता मान्य करता की नाही ?" 46 चिंतेची सत्ता ? चिंता, काळजी, ह्यांनी कधी मी त्रासला गेलो होतो ? मला नाही आठवत. मी जीवनात निश्चितपणे वावरत आलो. ना चिंता, ना हुरहूर. छट्. तुमचीही सत्ता मी कबूल करीत नाही. 66 'काय ? माझी सत्ता मान्य करीत नाहीस? अपमान करतोस माझा?” असे चितादेवीने रागाने म्हटले. तिने “फू फू फू फू ” करीत माधवाच्या डोळ्यांत फुंकर घातली. ती निघून गेली. परंतु माधव आंधळा डाला ! माधवाची बाहेरची दृष्टी गेली; परंतु अंतर्दृष्टी कोण नेणार ? ज्ञानचक्षू कोण नष्ट करणार ? तो तसाच शांतपणे खुर्चीत होता. आता समोरचा समुद्र दिसत नव्हता. त्याची घो घो गर्जना कानी येत होती. ती. स्वकर्तव्याचे त्याला स्मरण करून देत होती. 46 कोणते बरे विचार माझ्या मनात मघा खेळत होते ? हो, ही दलदल दूर करावी. आरोग्य निर्मावे. लोक सुखी करावे. त्यांच्या संसारात आनंद आणावा. गावातील रोग जातील. लहान मुलांची तोंडे फुलतील. त्यांचे गाल गुबगुबीत होतील, त्यावर गुलाबी रंग चढेल. दलदली जाऊन बागा ९६ फुलाचा प्रयोग S. $