पान:फुलाचा प्रयोग.djvu/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नकोत नाना विद्या. आजपर्यंत त्यात पैसा खर्च केला. आता दलदली दूर करण्यात खर्चू. दलदली गेल्या तर डास मरतील. हिवताप हटेल. रोग जातील. दलदली आहेत तेथे बागा फुलतील. तेथे लोक फिरायला जातील. मुले बाळे खेळतील. गावात आरोग्य वाढेल, आनंद वाढेल, सौंदर्य वाढेल. सर्वांना सुखी करणे ह्यात किती सुख आहे ! सर्वांच्या तोंडावर तेज, प्रसन्नता, आनंद, समाधान फुलवण्याची खटपट करणे, किती थोर आहे 'ते काम ? इतक्या वर्षांत असा सुंदर विचार माझ्या मनात का बरे आला नाही ? अशा विचारांत माधव रंगला होता. इतक्यात दिवाणखान्याच्या दारावर कोणी टकटक केले. " कोण आहे ? 66 'आम्ही तिघी बहिणी. 56 33 'एकेक आत या. एक बहीण आत आली. तिचे तोंड दुःखी होते. डोळे भरलेले होते. काय आपले नाव ? " माधवने प्रश्न केला. 22 48 44 " 22 दुःखदेवता. " ती म्हणाली. का आलात ? " 46 एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा. " माझी सत्ता तुम्ही मान्य करता की नाही ? 66 ' दुःखाची सत्ता ? छद, दुःखाची सत्ता मी कधीच मान्य केली नाही. दुःखे आली, गेली. आकाशात ढग येतात, जातात. आकाश पाठीमागे निळे निळे हसते. तसे माझे, दुःखांची मी टर करायचा. दुःखे माझ्यावर कोसळली तर खदखदा हसायचा.

  • 7

दुःखदेवता निघून गेली. दुसरी बहीण आलो. ती खिन्न व उदास होती. सुस्कारे सोडीत येत होती. शून्य दृष्टीने बघत होती. " आपले नाव काय ? " माधवने विचारले. " निराशा. " 66 काय काम ? पुन्हा घरी ९५