पान:फुलाचा प्रयोग.djvu/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुन्हा घरी

  • * * * * *

माधवच्या घरी म्हातारा भय्या होता. तो आपल्या धन्याची रोज वाट बघत असे. तो दिवाणखाना झाडून ठेवी, अंगण झाडून ठेवी. रोजच्याप्रमाणे भय्या उठला व अंगण झाडायला गेला. तो अंगणात कोण निजले होते ? तो तर धनी, माधव तेथे पडला होता. त्याला झोप लागली होती. भय्याला वाईट वाटले. धनी- साहेब का रात्री आले ? त्यांनी हाका मारल्या असतील ? मला जाग नाही आली. अशी कशी झोप लागली मला खाली जमिनीवर निजले. पांघरायला नाही, आंथरायला नाही. अरेरे. त्या भय्याला फार वाईट वाटले. त्याने धन्याला हलके हलके हाका मारल्या. माधवने डोळे उघडले. धनीसाहेब ! कोठे आहे मी ? • 66 23 66 आपल्या घरी. तुम्ही रात्री आलेत वाटते ? मला हाका नाही मारल्यात ? उठा. गारठला असाल. दिवाणखाना स्वच्छ झालेला आहे. पलंगावर स्वच्छ गादी आहे. उठा ! }} भय्याने हात धरून मालकाला वर नेले. गादीवर निजविले. माधव झोपी गेला. जणू कित्येक वर्षे तो झोपला नव्हता. बन्याच वेळाने तो उठला. त्याने स्नान वगैरे केले. तो जेवला. नंतर पुन्हा झोपला. तिसरे प्रहरी तो उठला. गच्चीत आरामखुर्चीत तो पडला होता. समोर समुद्र उचंबळत होता. तो पाहू लागला. तो विचार करू लागला. आपल्या गावाला समुद्र आहे. परंतु दलदलीही आहेत. कोण बुजवणार ह्या दलदली ? भी बुजवीन. माझी सारी संपत्ती त्यांत खच' करीन. आता नकोत पुस्तके, ९४ फुलाचा प्रयोग