पान:फुलाचा प्रयोग.djvu/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मंदोदरी पडद्यावर आल्या व गेल्या, संयुक्ता व पद्मिनी चमकल्या. नूरजहान व मुम्मताजमहल दिसल्या. हेलेन दिसली. सर्व देशांतील सौंदर्य रमणी येत होत्या व जात होत्या. परंतु एक चित्र आले. अति मोहक असे ते सौंदर्य होते. माधवच्या हातातील कांडी थांबली. तो त्या चित्राकडे पाहू लागला. 'काय सुंदर ! ओहो ! किती खुबसुरत !' असे शब्द त्याचा तोंडातून बाहेर पडले. तोच कडाडकडाड असा आवाज झाला. जणू शेकडो बाँबगोळेच पडले. राजा नि प्रजा, कोठे गेले सारे ? कोठे गेला तो देखावा ? कोठे गेली ती राजधानी ? कोठे गेला तो माधव ? कोठे आहे सैतान ? त्यांचे का तुकडे झाले? त्यांच्या का ठिकऱ्या ठिकन्या झाल्या ? भयंकर आवाज ! + राजाच्या दरबारात *