पान:फुलाचा प्रयोग.djvu/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देतो. नोकर चाकर सेवेला देतो. जाऊ नका आम्हांला सोडून. म्हणाला. सैतान व माधव मोठ्या बंगल्यात राहू लागले. त्यांचा थाटमाट काय विचारता ? सारे त्यांना भीत. सारे त्यांना सलाम करीत. ते दोघे रस्त्यातून ऐटीने फिरत जात. एके दिवशी माधव राजाजवळ बसला होता. राजा म्हणाला, "माझ्या मनात एक विचित्र इच्छा उत्पन्न झाली आहे. ती तुम्ही पुरी कराल ! " हो ! " माधव म्हणाला. 66 इच्छा अशी झाहे की, प्राचीन काळापासून तो आतापर्यंत जितक्या सुस्वरूप अशा स्त्रिया ह्या पृथ्वीवर झाल्या, त्यांचे दर्शन मला व्हावे. माझ्या डोळ्यांसमोरून त्या सर्व जाव्यात. }) $( 'ठीक. तुमची इच्छा पूर्ण करीन. " " किती दिवसांनी ?" 64 चार दिवस थांबा. " " तोपर्यंत मी प्रचंड मंडप घालायला लावतो. त्या समारंभात सारे येऊ देत. क्षणभर मौज, " माधव गेला. त्याने सैतानाला ती गोष्ट सांगितली. “ कसे काय हे करणार ? " सैतानाने विचारले. " ते मला माहीत, की तुला ? मी राजाला कबूल केले आहे, तू सारे शक्य केले पाहिजे. " माधव बेफिकीरपणे म्हणाला. “ वाटेल ते तू कबूल करावेस व माझ्यावर जबाबदारी टाकावीस... तुम्ही माणसे म्हणजे विचित्र प्राणी. ” ते काही असो, कराराप्रमाणे वाग म्हणजे झाले. जास्त बोलण्याची १३ चरूर नाही. 37 राजा 46 'तुला थोडे धाडस केले पाहिजे. " करीन. " 2, 66 उद्या मध्यरात्री येथून चार कोसांवर असलेल्या जंगलात जा. तेथे पिशाच्चांची वस्ती आहे. ती एकदम तुझ्या अंगावर धावतील. परंतु घाबरू नकोस. 'सैतानाची शपथ ' असे म्हण. म्हणजे ती गोगलगायीप्रमाणे फुलाचा प्रयोग ?