पान:फुलाचा प्रयोग.djvu/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होतील. ती हात जोडून उभी राहतील. त्यांना राजाची इच्छा सांग, इच्छा पुरी करण्याचे साधन द्या, असे म्हण. जे देतील ते घेऊन ये. " दुसऱ्या दिवशी मध्यरात्री माधव उठला. बाहेर कोल्हे ओरडत होते. अंधार होता. थंडी मी म्हणत होती. परंतु निर्भय माधव जात होता. त्या जंगलाजवळ तो आला. एकदम किंचाळ्या त्याच्या कानी आल्या. तो चपापला. परंतु पुन्हा पुढे चालला. पिशाच्चे त्याच्या अंगावर धावली. 'सैतानाची शपथ ' असे तो म्हणाला. पिशाच्चे शांत झाली. "( राजाला प्राचीन काळापासूनच्या सर्व सुंदर स्त्रिया बघण्याची इच्छा आहे. ती इच्छा पुरी करण्याचे मी कबूल केले आहे. ती इच्छा पुरी करण्याचे साधन द्या. " माधवाने सांगितले. 44 ही घ्या जादूची कांडी. 'चल चल चल चल ; चल चल चल चल ; चल चल चल चाल. ' असे कांडी फिरवीत म्हणा. प्राचीन काळापासूनच्या सर्व सुंदर स्त्रिया एकामागून एक पडद्यावर दिसतील व नष्ट होतील. परंतु एक धोक्याची सूचना लक्षात ठेवा. " कोणतो ? " (2 त्या स्त्रियांची चित्रे पडद्यावर पाहाताना तुम्हांला मोह नाही पडता कामा. नाही तर एखाद्या सुंदर स्त्रीचे लावण्य बघाल व तुम्ही लाळ घोटू लागाल. ' किती सुंदर, खरेच. किती सुंदर ' वगैरे शब्द तोंडातून बाहेर पडता कामा नयेत. केवळ अलिप्त व अनासक्त रीतीने सारे काम करा. "C हो समजले. जातो मो. " सैतानास प्रणाम सांगा. " 73 'बरे. 24 माधव आला. त्याने राजाला तयार असल्याचे कळविले. दिवस ठरला. त्या दिवशी रात्री हा प्रयोग व्हावयाचा होता. सारा मंडप भरला. उच्चासनावर राजा बसला होता. सरदार, दरकदार, इनामदार, जहागीर दार बसले होते. सामान्य जनताही बसली होती. एकीकडे स्त्रिया होत्या. सर्वांचे डोळे अधिर झाले. समोर रुपेरी पडदा होता. माधव बाजूला येऊन उभा राहिला. टाळ्यांचा कडकडाट झाला. सारे शांत झाले. माधव कांडी फिरवू लागला. पडद्यावर लावण्यमयी मूर्ती दिसू लागल्या. प्रत्येकीचे नावही लिहिले जाई. सीता, सावित्री, द्रौपदी, दमयंती, रुक्मिणी, राजाच्या दरबारात ९१