पान:फुलाचा प्रयोग.djvu/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देवळात जातो त्याचाच का फक्त विश्वास असतो ? तू वेडी आहेस. मी ह्या विश्वमंदिरात देवाला बघतो. तो सर्वत्र आहे. ज्याने सूर्यचंद्र निर्माण केले, तो का फक्त देवळात आहे ? तो अणूरेणूत आहे. तो चराचरात आहे. तो माझ्यात आहे. तो तुझ्यात आहे. तुझे व माझे डोळे भेटतात. हृदयाच्या तारा छेडल्या जातात. कोण करतो हे सारे ? हा सारा त्याचाच खेळ, त्याचीच लीला. तो परमेश्वर ओतप्रोत भरलेला आहे. ते चैतन्य सर्वत्र विलसत आहे. त्याला राम म्हणा, रहीम म्हणा; अल्ला म्हणा, ब्रह्म म्हणा; प्रभू म्हणा, परमेश्वर म्हणा; नाव कोणतेही द्या. मुख्य गोष्ट ध्यानात घेतली म्हणजे झाले. " 44 किती सुंदर बोलता तुम्ही ! परंतु मला आपले वाटते की, देवळात जावे आणि तुम्ही देवाधर्मासमक्ष लग्न कधी लावणार ? आपण असेच किती दिवस राह्यचे ? ते बरे नाही दिसत. लोक नावे ठेवतील. आपण · लवकर लग्न लावू असे कितीदा म्हणालेत. परंतु तुम्ही मनावर का बरै घेत नाही ? तो दुष्ट मनुष्य मोडता घालीत असेल. होय ना ? खरेच आपण लवकर लग्न लावू या. म्हणजे सारे बरे होईल. होय म्हणा.

- " वेडी आहेस तू. तो पाहा सूर्य अस्तास जात आहे. आकाशात अग्नी

• पेटला आहे. त्या अग्नीसमोर आपण लग्न लावू. ये. हा पाहा वारा गुणगुण · करतो आहे. बारा जणू विवाहमंत्र म्हणत आहे. ही पाहा फुले वरून पड आहेत. ह्या जणू अक्षता. त्या लहानशा मांडवातल्या लग्नापेक्षा विश्वाच्या विश मंडपात हे लग्न अधिक पवित्र नाही का ? 7" 16 मला काही समजत नाही. मी वेडी आहे. तुमचे म्हणणे गोड वाटते, खरे वाटते. परंतु खात्री होत नाही. " (8 'जुन्या कल्पना आपल्या मानगुटीस बसलेल्या असतात. खरेच, इतके दिवस आपण भेटत आहोत. परंतु तुझे नाव मला माहीत नाही. काय तुझे नाव ? " काय करायचे नावाशी ? नामरूप शेवटी मिथ्या आहे. परंतु व्यवहारासाठी त्याची जरूरी आहे. सांग, तुझे नाव सांग. " " आधी तुमचे सांगा. " ७६ * फुलाचा प्रयोग