पान:फुलाचा प्रयोग.djvu/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रेमासाठी केलेल्या त्यागाने. " "L 'मी आता जाते. उशीर होईल. आई रागे भरेल. " थांब जरा. आलीस नाही तो निघालीस, " 86 पुढे तुमचीच होणार आहे. जरा धीर धरा. जाऊ दे. सोडा हात- माझा ओबडधोबड हात.. 66 ' तुझा फुलासारखा हाल. इश्श. काही तरीच. रात्र झाली. आता जाऊ दे मला. ती निघून गेली. माधव तेथेच होता. सैतान हळूच हसत तेथे आला. “ माझी आठवण तरी झाली का ? प्रेमात अगदी दंगच ! " सैतानाने विचारले. "} 21 'तू दूर उभा राहात जा. लोकांना तुझी भीती वाटते. " “ आणि तुला ? " 46 भी जगात कोणाला भीत नाही. मधून मधून माधव व ती मुलगी ह्यांच्या भेटी होत. चोरून कोठे तरी जात. बोलत बसत. प्रेमाच्या गोष्टी होत. आज पुन्हा त्या बागेत बोलत होती. 27 " तुमच्या बरोबर तो कोण असतो ? माझा मित्र. " ." त्याची संगत सोडून द्या. त्याला बघताच हृदयात चर्र होते. माझी छाती धडधड करते. चांगला नाही तो माणूस दुष्ट दिसतो. कपटी दिसतो. त्याचे हसणे भेसूर वाटते. खरेच सांगते मी. त्याची संगत सोडा. ". तुम्ही बायका भित्र्या. काय करणार आहे तो ?” 46 " मी तुम्हांला एक विचारू ? " एक का, दहा प्रश्न विचार. " " तुम्ही कधी देवळात जाता का ?.". " मी कधी देवळात जात नाही.

का बरे ? तुमचा देवावर विश्वास नाही ? " मधुरीची भेट ७५