Jump to content

पान:फुलाचा प्रयोग.djvu/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तिकडे निघाली. ती लाजत होती, भीत होती. ती उत्सुक होती, अधीर: होती. मन धावत होते. परंतु पावले हळूहळू पडत होती.
 सैतान दूर होता. माधव तेथे एकटाच होता. ती तेथे गेली. खाली बसली. कोणी बोलेना. क्षणभर एकमेक एकमेकांकडे बघत. पुन्हा सारे शांत.
 "मी तुझी वाट बघत होतो."
 "मी घरी तुमची आठवण करीत होत्ये."
 "तुझ्यावर खरेच माझे प्रेम आहे."
 "मला नाही खरे वाटत. . तुम्ही श्रीमंत, मी गरिब. हे पाहा माझे हात.ओबडधोबड हात.धुणी धुऊन, भांडी घासून, दळणकांडण करून हे हात ताठरले आहेत. हे हात मऊ नाहीत. घट्टे पडले आहेत माझ्या हातांना. असे हे हात तुम्ही आपल्या हातात घ्याल ? "
 "हे बघ घेतो. तुझ्या हातांसारखे सुंदर हात जगात नाहीत. तू माझी राणी, तू माझी प्रेमदेवता."
 "हे काय तुमच्या हातात आहे ? "
 "गुलाबाचे फूल."
 "मला द्या ते."
 " हे घे."
 तिने त्या फुलाच्या पाकळ्या केल्या. नंतर त्या सान्या पाकळ्या आपल्या मुठीत धरून तिने विचारले, " एकी का बेकी ? "
 "एकी. " तो म्हणाला.
 "या, आपण ह्या पाकळ्या मोजू. " ती म्हणाली.
दोघांनी पाकळ्या मोजल्या. त्या सम नाही निघाल्या. विषम निघाल्या.
 “कोठे आहे एकी ? बेकी तर निघाली !" ती खिन्न होऊन म्हणाली.
 "मग त्यात काय ?"
 "तुमचे प्रेम नाही म्हणून बेकी निघाली. "
 "काही तरीच. तुम्ही बायका वेड्या आहात. अशाने का प्रेम सिद्ध होते ?"
 " मग कशाने ?"

७४ फुलाचा प्रयोग