पान:फुलाचा प्रयोग.djvu/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मधुरो चो भेट

माधव जे पेय प्यायला, त्याचा एक विशेष परिणाम होत असे. ते पेय प्यायल्यावर जी स्त्री प्रथम दिसेल तिच्यावर प्रेम जडायचे असे होत असे. माधव व सैतान जात होते. माधवाच्या मनात आज निराळ्याच भावना उचंबळत होत्या. तो आज नवीन झाला होता. ती पाहा एक मुलगी देवळात जात आहे. हातात पूजेचे ताट आहे. तिच्या अंगावर अलंकार नाहीत. साधे पातळ आहे. गरिबाची आहे घाटते ती ? माधवाने तिला पाहिले; त्याचे तिच्यावर प्रेम बसले. तो वेडा झाला. तो तिच्या पाठोपाठ जाऊ लागला. ती मुलगी बावरली, घाबरली. ती लगबगीने जाऊ लागली. माधव तिच्या पाठीशी आहे. तिच्या हातातील पूजेचे ताट खाली पडले, माधव एकदम लघळपणे खाली वाकला. त्याने ते ताट उचलून तिच्या हातांत दिले. ती लाजली. रागावली. 44 लाज नाही वाटत पाठोपाठ यायला ? माणसे का कुत्री तुम्ही ? हा काय चावटपणा ? खबरदार पाठोपाठ याल तर. मनाची नाही तर निदान जनाची तरी. चाहाटळ कुठला. मला नसते वाटते ताट उचलता आले ? तुझ्यामुळे तर ते पडले. " असे ती संतापाने म्हणाली. माधव थबकला. मुलगी निघून गेली. परंतु तिने मागे वळून पाहिले. पाठोपाठ येत आहे की काय हे का तिने पाहिले ? ते पाहाणे प्रश्नार्थक होते, की इच्छार्थक होते ? काय होता त्या पाहाण्यात अर्थ ? ६८ * फुलाचा प्रयोग